संग्रहित फोटो
पाटस : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता दौंड शहरात पिस्तूलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात ॲट्रॉसिटी, शस्त्र अधिनियम आणि अपहरण यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.
फिर्यादीनुसार, 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्री हातात कोयते, तलवारी घेऊन टोळक्याने पिडीत तरुणीच्या घरी धाड टाकली. संशयितांनी तरुणीच्या आईला मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. त्यानंतर घरात बळजबरीने प्रवेश करून कपाटातील रोकड आणि तरुणीच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून टोळक्याने तरुणीला उचलून पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई व्हर्ना कारमध्ये डांबले आणि पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी नदीम अन्वर शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड.) बादशहा आदम शेख (माजी नगराध्यक्ष, रा. कुंभार गल्ली, दौंड), शफीक मुलाणी (रा. मळद, ता. दौंड), इरफान उर्फ वसीम अन्वर शेख ( रा. सेंट सेबॅस्टियन स्कूल जवळ, दौंड), फैजल मेहफूज काझी (रा. नेने चाळ, दौंड), अशपाक समीर शेख ( रा. भीमनगर, दौंड), आफताब समीर शेख( रा. भीमनगर, दौंड) आरबाज अन्वर शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर 3 अनोळखी व्यक्ती दौंड पोलिसांनी 11 संशयितांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 363 – अपहरण, 395 – दरोडा, 354 – विनयभंग, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.दरम्यान या घटनेमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार
अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.






