Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्यापूर्वी वाकड येथील कावेरी नगर भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 12:56 PM
बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • बहिणीची छेड काढल्याचा राग
  • बेदम मारहाण करुन तरुणाचा खून
  • वाकडमधील घटनेनं खळबळ
पिंपरी : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्यापूर्वी वाकड येथील कावेरी नगर भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी घडली आहे.

 

मारोती बाळासाहेब बनसोडे (वय ३५, चिंचवड, मूळ- परळी, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित दशरथ साळुंखे (वय २६, थेरगाव, मूळ – बारामती, पुणे), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९, थेरगाव, मूळ- बीड) आणि भारत संजय पवार (वय २३, थेरगाव, मूळ बारामती, पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारोती बनसोडे याने आरोपी अमित याच्या बहिणीची छेड काढली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्या कारणावरून मारोती बनसोडे यांना आरोपींनी तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर आणि गुप्तभागावर जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर

घरासमोरील सांडपाण्यावरून सुरू असलेला वाद, त्यात मनात साचलेला राग आणि आपल्याकडे पाहून हसली या गैरसमजातून दिराने वहिनीच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याचा धक्कादायक प्रकार हर्षनगर, लेबर कॉलनी परिसरातून समोर आला आहे. लता गंगाधर साळवे (वय ५१) यांचा मृत्यू सुरुवातीला डोक्याला मार लागून झाल्याने अकस्मात मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला होता. मात्र, मुलाने व्यक्त केलेला संशय आणि पोलिसांच्या तपासातून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लता यांचा दीर सुभाष कचरू साळवे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

Web Title: An incident involving the murder of a young man has occurred in wakad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
1

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह
2

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
3

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
4

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.