Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना एका महावितरणच्या कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना परतूर शहरात घडली आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 11:44 AM
महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

परतूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता कर्तव्य बजावत असताना एका महावितरणच्या कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना परतूर शहरात घडली आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संभाजी प्रल्हाद शिंदे (वय ४१ वर्षे, रा. विठ्ठल रुखमाई मंदिर, परतूर) हे महावितरण कार्यालय परतूर येथे गेल्या सहा वर्षांपासून वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मोंढा भागातून श्री गणेशाची स्थापना मिरवणूक जात होती. या मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव व कोणताही अपघात घडू नये म्हणून वरिष्ठांच्या परवानगी व आदेशानुसार मोंढा भागातील वीजपुरवठा २० मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता. या दरम्यान संभाजी शिंदे हे मोंढा भागातील ट्रान्सफॉर्मरजवळ कर्तव्यावर उभे होते.

मिरवणूक पुढे निघून गेल्यानंतर रात्री १०:३० च्या सुमारास अचानक तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत शिंदे यांना शिवीगाळ करत चापट आणि बुक्क्यांनी मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर संभाजी शिंदे यांनी परतूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली आहे.

हे सुद्धा वाचा  : दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!

खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

Web Title: An incident involving the assault of a mahavitaran employee has occurred in partur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • mahavitaran

संबंधित बातम्या

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
1

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…
2

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
3

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
4

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.