
अल्पवयीन मुलीवर 4 जणांचा अत्याचार, पन्नास रुपयाचे आमिष दाखवले अन्...; हिंगोलीतील संतापजनक घटना
हिंगोली : राज्यासह देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तेरा वर्षीय मतीमंद भोळसर चिमुकलीवर गावातील चार जणांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. अल्पवयीन चिमुकलीचे कुटुंबीय घरी नसताना चिमुकलीच्या मतीमंदपणाचा गैरफायदा घेत तिला बिस्किटे व पन्नास रुपये देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांकडून दुचाकीवर बसून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील एका आरोपीने अशाच प्रकारे बिस्किट देऊन चिमुकलीच्या मंतीमंदपणाचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. हे चारही नराधम आरोपी त्याच गावातील रहिवासी आहेत. ही घटना समोर आल्यानंतर सुन्न झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार नराधमापैकी तिघा जणांना पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत. चौथ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीची हत्या
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने एका ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेतात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार (१८ ऑगस्ट)च्या दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवत एका संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारीच राहणाऱ्या एका तरूणाने ओळखीचा फायदा घेत संबंधित ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली असावी. दुसरीकडे मुलगी बराच वेळ नजरेस न पडल्याने आईवडिलांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनीदेखील तातडीने तापस सुरू केला असता, जवळच्याच शेताच्या परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास पथकांना कामाला लावण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.