संग्रहित फोटो
शिरूर : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणी (वय २२ वर्ष) हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पाच ते दिनांक 21ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शिरूर येथील हॉटेल मार्वल इन लॉजिंगमधील रुममध्ये चांगले पैशाचे काम देण्याच्या बहाण्याने दिपक श्रीमंदीलकर, दिपक भोसले, सागर ढवळे, अजय घेगडे यांनी त्यांच्या कारमधून मला नेहून दिपक श्रीमांदीलकर, अजय घेगडे ,ऋषीकेष ढवळे एका अनोळखी व्यक्ती यांनी मला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर खायला देऊन ईच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार व अत्याचार केला, अशी तक्रार तरुणीने दिली आहे. तसेच अनिकेत पठारे याने देखील माझेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिवीगाळ दमदाटी केलेली आहे, असाही आरोपी पिडीत तरुणीने केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : १२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई






