Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! वारजे भागात तरुणावर कोयत्याने हल्ला, सपासप वार केले अन्…

वारजे माळवाडी परिसरात सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 21, 2025 | 04:19 PM
पुणे हादरलं! वारजे भागात तरुणावर कोयत्याने हल्ला, सपासप वार केले अन्...

पुणे हादरलं! वारजे भागात तरुणावर कोयत्याने हल्ला, सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता वारजे माळवाडी परिसरात सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नागेश आनंदा वांजळे (वय ३४, रा. देवगिरी कॉलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. वांजळे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चांगदेव उर्फ पप्पू अशोक वांजळे (वय ३७, रा. देवगिरी काॅलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली. नागेश वांजळे यांची आई कमल (वय ५८) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश आणि आरोपी चांगदेव यांच्यात वाद झाला होता. चांगदेव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नागेश तो राहत असलेल्या इमारती जवळ थांबला होता. त्या वेळी चांगदेव तेथे आला. त्याने नागेश याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. आरोपीने नागेशला माराहण करुन कोयत्याने वार केले. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण; पोलिसांनी 7 जणांना पकडले

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

निगडीत तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: An incident of a young man being attacked by a coyote has come to light in warje area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
3

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
4

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.