Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

खेड तालुक्यातील कनेरसर येथे जमीन विकसनाच्या ठेकेदारी कामावरून निर्माण झालेल्या वादातून १० ते १५ जणांच्या टोळीने २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 01:28 PM
तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:
  • तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला
  • लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
  • टोळीयुद्धाच्या घटना परिसरात वाढल्या
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कनेरसर येथे जमीन विकसनाच्या ठेकेदारी कामावरून निर्माण झालेल्या वादातून १० ते १५ जणांच्या टोळीने २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८) दुपारी घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, खेड पोलिस ठाणे येथे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी तरुणाचे नाव शेखर पोपट तांबे (वय २२, रा. वरुडे, ता. खेड) असे आहे. ते शेती व जमीन विकसनाचा व्यवसाय करतात.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील एका इंजिनिअरिंग कंपनीसमोर जमीन विकसनाचे काम सुरू असताना संशयित आरोपींनी कंपनीचे अधिकारी सुंदरम यांच्याशी कामावरून वाद घातला. परिस्थिती चिघळू नये म्हणून शेखर तांबे यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले आणि वाद शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी सिद्धार्थ झोडगे याने “तुला खूप माज आला आहे, आम्हालाच येथे काम करायचे आहे,” असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी काठीने तांबे यांच्या पाठीवर व डाव्या खांद्यावर प्रहार केला. जय चौधरी याने तोंडावर मारहाण करून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दगडाने डोक्यावर प्रहार केल्याने तांबे गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यात मनोज मकाळे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माशेरे (रा. कनेरसर, ता. खेड), जय चौधरी (रा. पाबळ, ता. शिरूर) तसेच इतर १० ते १५ अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खेड पोलीस यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ (बेकायदेशीर जमाव), ३२३ (स्वेच्छेने दुखापत), ३२४ (घातक शस्त्राने दुखापत), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर

…म्हणून टोळीयुद्धाच्या घटना

खेड तालुक्यातील एसईझेड प्रकल्प परिसरात नव्या कंपन्यांमधील ठेकेदारी कामे मिळवण्यासाठी यापूर्वीही टोळीयुद्धाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत खुनाच्या घटनाही समोर आल्या असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.

Web Title: An incident of a youth being beaten up has taken place in kanersar khed taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
1

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
2

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
3

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.