Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

जेव्हा अमेरिकी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना आढळून आले की नार्नेचे भारतातील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून 'गुप्त संबंध' होते. त्याच संबंधादरम्यान, नार्नेने ५ जून २०२५ रोजी सबिनेनीशी लग्न केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2026 | 11:47 AM
indian software engineer arrested wife murder case usa secret affair avinash narne rajitha sabineni

indian software engineer arrested wife murder case usa secret affair avinash narne rajitha sabineni

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यावर पत्नीच्या प्रथम श्रेणी हत्येचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
  • तपासात भारतातील प्रेयसीशी गुप्त संबंध आणि मृतदेहाचा फोटो तिला पाठवल्याचा आरोप समोर आला.
  • पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने हा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी पुरावे तयार करण्याचाही प्रयत्न केला.
अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बेलव्ह्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील अविनाश नार्ने याच्यावर पत्नी राजिता सबिनेनी हिच्या प्रथम श्रेणी हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर हा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी घटनास्थळी बनावट परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप आहे.

ही घटना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. अविनाश नार्ने यांनी स्वतः पोलिसांना फोन करून पत्नी बाथरूममध्ये अडकली असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाथरूमचा दरवाजा तोडला असता राजिता सबिनेनी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेल्या आढळल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळीच मृत घोषित केले.

सुरुवातीच्या चौकशीत नार्ने यांनी आपण काही वेळ घराबाहेर गेलो होतो आणि परत आल्यानंतर पत्नी बाथरूममध्ये अडकलेली दिसली, असा दावा केला. मात्र, तपासात घरात इतर कोणाचाही प्रवेश झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यानंतर किंग काउंटी वैद्यकीय तपासणी कार्यालयाच्या अहवालात राजिता यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले आणि हा मृत्यू खून असल्याचे घोषित करण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला

तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशी अनेक धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अविनाश नार्ने यांचे भारतातील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून गुप्त प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, ५ जून २०२५ रोजी राजिता यांच्याशी विवाह झाला तेव्हाही ही महिला लग्नसमारंभाला उपस्थित होती. लग्नानंतरही आरोपी आणि संबंधित महिलेचे संबंध कायम असल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.

घटनेच्या दिवशी आरोपीने आपल्या प्रेयसीशी अनेक वेळा फोनवर संवाद साधल्याचे तपासातून समोर आले. याचदरम्यान पत्नीचा मृतदेह असलेला फोटोही तिला पाठवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे तपासाला नवे वळण मिळाले.

तपासादरम्यान पोलिसांना राजिता यांनी पतीला पाठवलेले अनेक संदेशही सापडले. त्यामध्ये पती बनवत असलेल्या पेयाची चव वारंवार “कडू”, “औषधासारखी” आणि “खोकल्याच्या औषधासारखी” लागत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. मृत्यूच्या दिवशीही त्यांनी याच स्वरूपाचा संदेश पाठवला होता. या संदेशांचाही तपासात महत्त्वाचा भाग म्हणून विचार केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ankara NATO Summit: ‘इराणचे नेते लबाड आहेत…’ ट्रम्प यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शांतता करार धोक्यात

सखोल तपासानंतर ५ जुलै २०२६ रोजी अविनाश नार्ने यांच्यावर प्रथम श्रेणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोषी ठरल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने त्यांच्यासाठी सुमारे ५० लाख अमेरिकन डॉलर (अंदाजे ₹४७ कोटींपेक्षा अधिक) इतका जामीन निश्चित केला असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

Web Title: Indian software engineer arrested wife murder case usa secret affair avinash narne rajitha sabineni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • America
  • America news
  • crime news

संबंधित बातम्या

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
1

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.