Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

एरंडवणे येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात तरुण राहण्यास आहे. ५ जुलै रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पौड फाटा पुलाखाली पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने मोबाईल हिसकावून पळ काढला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2026 | 03:56 PM
बाईकवरून चोरटे आले अन् मोबाईल चोरून घेऊन गेले; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच...

बाईकवरून चोरटे आले अन् मोबाईल चोरून घेऊन गेले; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच...

Follow Us
Follow Us:

पुणे : कोथरूड परिसरात एका तरुणाचा मोबाईल हिसकावल्यानंतर त्यातील माहितीचा गैरवापर करून बँक खात्यातून ऑनलाईन पैसे वळते केले. नंतर तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवरून त्यांच्या मित्र-मैत्रिणींना पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवून त्यांच्याकडून देखील पैसे मागविले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारात मोबाईलसह एकूण ९२ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४, ३०३(२) आणि ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडवणे येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात तरुण राहण्यास आहे. ५ जुलै रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पौड फाटा पुलाखाली पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने मोबाईल हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या याप्रकारामुळे तक्रारदाराला काहीही प्रतिकार करता आला नाही. मोबाइल चोरीनंतर आरोपीने त्यातील माहितीचा वापर करून तक्रारदाराचे ऑनलाइन बँक खाते उघडले.

त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ६७ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅप खात्याचा वापर करून त्यांच्या मित्र-मैत्रिणींना पैशांची तातडीची गरज असल्याचे मेसेज पाठवले. या मेसेजवर विश्वास ठेवून एका मित्राने १० हजार रुपये, तर एका मैत्रिणीने १५ हजार रुपये यूपीआयद्वारे पाठवले. अशाप्रकारे मोबाईलची किंमत आणि ऑनलाईन व्यवहार मिळून तक्रारदाराचे एकूण ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दिली आहे.

चोरट्यांनी हिसकावला आयफोन 

हातातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचा अॅपल आयफोन १४ प्लस मोबाइल तिघा अनोळखी युवकांनी हिसकावून नेला. ही घटना ४ जुलै रोजी पहाटे ३.१५ वाजता घडली. आरोपींचे वय अंदाजे १७ ते १९ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Kolhapur Crime : आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; एसटी स्टँडवरच भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या

Web Title: Thieves arrived on a bike and stole a mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Theft Case

संबंधित बातम्या

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
1

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
2

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
3

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
4

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.