Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 01:18 PM
रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणवेशातील या गुन्हेगारांनी चार पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल सात तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, मात्र एका तरुणाने आपल्या ‘स्मार्ट वॉच’चा कौशल्याने वापर करून मदतीचा संदेश पाठवल्याने या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

 

या घटनेबाबत शुभजीत उमेश शर्मा (२८, रा. विमाननगर, पुणे) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी शुभजीत हे त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी, त्यांच्या पत्नी आणि मेहुणे सय्यद जुबेर अहमद यांच्यासह टाटा पंच कारने (क्रमांक MH 12 WZ 1692) लोणावळ्याकडे फिरायला जात होते. रात्री ८:३० च्या सुमारास कामशेत परिसरात सहा अज्ञात पोलिसांनी त्यांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली. गाडीची झडती घेत असताना त्यांना गाडीत ‘Amber Leaf’ कंपनीचे सिगारेटचे पाकीट सापडले. या पाकिटात गांजा असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांनी पर्यटकांना पोलीस कारवाईची भीती घातली आणि ही कारवाई टाळण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली.

पोलिसांनी या सर्वांचे अपहरण करून त्यांना सात तास ताब्यात ठेवले आणि कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. पैसे देण्यासाठी पर्यटकांना तळेगाव येथील एटीएमवर नेण्यात आले. दरम्यान, फिर्यादीच्या मित्राने आपल्या हातातील स्मार्ट वॉचचा वापर करून एका मित्राला संदेश पाठवला. या संदेशानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि तीन पोलीस उपायुक्तांनी तातडीने सूत्रे हलवली आणि पर्यटकांची सुटका केली. सुरुवातीला हे कृत्य गुन्हेगारांचे असावे असे वाटले होते, परंतु तपासात हे अपहरणकर्ते चक्क गणवेशातील पोलीस असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार करत आहेत.

Web Title: An incident has occurred on the lonavala highway where police kidnapped tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना
1

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
2

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
3

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘त्या’ घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी
4

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘त्या’ घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.