Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेच्या भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ, नेमकं काय घडलं?

पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य इमारतीत (मनपा भवन) महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि .८) दुपारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 12:30 AM
पुणे महापालिकेच्या भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ, नेमकं काय घडलं?

पुणे महापालिकेच्या भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ, नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य इमारतीत (मनपा भवन) महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि .८) दुपारी घडली आहे. यामुळे महापालिकेत चांगलाच गोंधळ उडाला होता. तर, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कविता पटेकर (रा. मांगडेवाडी, कात्रज) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिका कर्मचारी राकेश विटकर (५३) यांनी तक्रार दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक, क्रीडा व सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आपल्या दालनात शासकीय कामकाज पाहत होत्या. यावेळी आरोपी महिला पटेकर हिने कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय राऊत यांच्या दालनात प्रवेश केला. दालनात शिरल्यानंतर आरोपी महिलेने उपायुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली. मोठ्या आवाजात आरडाओरडा आणि अरेरावीची भाषा वापरत तिने कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

अचानक झालेल्या या गोंधळामुळे विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली आणि काही काळ कार्यालयीन कामकाज पूर्ण ठप्प झाले. गोंधळ सुरू असतानाच, आरोपी महिलेने आपल्या मोबाईलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून महिला अधिकाऱ्याची आणि पालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; धक्कादायक कारणही समोर

आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून सहा वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे महिलेने नातेवाईकांना भासवले. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कुरुळी, ता. खेड येथील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे. अवेज मेहबूब शेख (वय ६ वर्ष) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक महमद शेख (४९, पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसरीन मेहबुब शेख (२७, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे, मूळ – धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (कुरुळी, ता. खेड, मूळ – पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: An incident of abusing a female deputy commissioner has taken place in the pune municipal corporation building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं
1

भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…
2

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

Pune Crime: धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल
3

Pune Crime: धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु
4

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.