
माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा...; पुण्यात एकावर धारदार शस्त्राने सपासप वार
शंकर बचन कोरडे (४५, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाळ रामदास पारधे (४७, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव दाभाडे) असे जखमीचे नाव असून, त्यांनी सोमवारी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारधे हे आपल्या कामासाठी मजूर बघून पुन्हा आपल्या घरी चालले होते. त्यावेळी आरोपी शंकर कोरडे याने फिर्यादी यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. ‘माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा हिशेबच करतो’ असे म्हणत आरोपीने त्यांना ढकलून खाली पाडले. नंतर घरातून धारदार हत्यार आणून पारधे यांच्या डोक्यावर दोन वेळा वार केला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तिच्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री भैरवनाथ मंदिर, पिंपळे निलख येथे घडली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर त्रंबक चोरघडे (३१, बाणेर बालेवाडी फाटा, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलभीम शिंदे (वय५२, पिंपळे निलख), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला. अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि अनोळखी तरुणाने मिळून ज्ञानेश्वर यांना लाथा, बुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार करून जखमी केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.