Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्वती दर्शन भागात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2025 | 12:30 AM
पर्वती दर्शन भागात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्...

पर्वती दर्शन भागात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता. याबाबत महिलेचा पुतण्या अमितने आरोपी आदेशला जाब विचारला होता. १६ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला. वादातून आदेशने अमितच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदेशला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.

लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल

कानाखाली मारल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (२३, रा. तीन हत्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन उर्फ निखील अशोक सावळे (१९) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धैर्यशील आणि आर्यन यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ११ जुलै रोजी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी आर्यनने धैर्यशीलच्या कानाखाली मारले होते. त्याच रागातून आरोपीने आर्यनवर लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी धैर्यशील मोरे याचा शोध घेतला. त्यानुसार, आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, ‘कानशिलात मारल्याचा राग मनात धरला होता,’ असे त्याने सांगितले.

Web Title: An incident of attempted murder of a young man has taken place in the parvati darshan area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
3

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
4

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.