Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्…; बारामतीतील संतापजनक प्रकार

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील २३ वर्षीय प्रतिक धंगेकर या तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2026 | 04:47 PM
जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्...; बारामतीतील संतापजनक प्रकार

जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्...; बारामतीतील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

बारामती : एका भोंदू बाबाने आई-वडिलांची फसवणूक केल्याने या भोंदू बाबाचे बिंग फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील २३ वर्षीय प्रतिक धंगेकर या तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपी पिंटू धुमाळ (रा कोऱ्हाळे ता. बारामती) याला पोलिसांनी अटकही केली आहे.

प्रतिक धंगेकर हा पुण्यात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, त्याच्या आई-वडिलांची फसवणूक भोंदूगिरीच्या माध्यमातून पिंटू धुमाळ याने केली होती, या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी दुपारी बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात असताना आरोपींनी कारमधून येत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. धंगेकरचे दोन्ही मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. तांदुळवाडी रोडवरील एका हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेऊन आरोपींनी त्याला लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी ‘पिंटू धुमाळ याच्या पाया पडून माफी माग’ असा दबाव टाकत व्हिडिओ शूट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तसेच, आरोपींनी त्याच्या खिशातील १५,३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान त्याचे घड्याळही तुटून पडले असून, ते आरोपींनी उचलून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर मारहाण करून आरोपींनी त्याला रस्त्यावर सोडून दिले. तसेच, पोलीसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.

या प्रकरणी पिंटू उर्फ शरद धुमाळ, भारत मोहीते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण करून मारहाण करणे आणि जबरीने वस्तू काढून घेण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपीला अटक करण्यात आले असून, अटक आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम आणि पोलीस जवान दादा दराडे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

पुर्ववैमन्यासातून घडलेल्या रक्तरंजित घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले असून, फुरसुंगीत ऐन गर्दीच्या वेळीच सहा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाच्या थरारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांमधील वादविवाद व वर्चस्वातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.

Web Title: An incident of beating a young man has taken place in baramati taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

धडा शिकवण्यासाठी रचला कट… आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या
1

धडा शिकवण्यासाठी रचला कट… आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…
2

‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…
3

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
4

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.