Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्…; फुलंब्रीतील संतापजनक घटना

कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पाण्यात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2026 | 11:37 AM
तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्...; फुलंब्रीतील संतापजनक घटना

तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्...; फुलंब्रीतील संतापजनक घटना

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पाण्यात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अत्याचाराचा देखील व्हिडीओ काढून तो समाज माध्यांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेला तरुणाचा भाऊ आणि वडिलांनी देखील मारहाण करत धमकी दिली. ही घटना १ एप्रिल ते १५ जुलै २०२६ दरम्यान एका हेअर ट्रान्सप्लांट सेंटर व फुलंब्रीतील एका हॉटेलवर घडली आहे. सरफराज मेहबूब गोनगावे, त्याचा भाऊ अरबाज गोनगावे, वडिल मेहबूब गोनगावे (सर्व रा. गल्ली क्रं.७, रहिमनगर, आजाद चौक) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपी सरफराज गोनगावे याला गुरुवारी राञी बेड्या ठोकल्या आहेत. पीडिता ही एका मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीची इंटर्नशिप सुरू करत आहे. सरफराज हा तिचा शाळेपासूनचा परिचित असून, जानेवारी २०२६ पासून ती आरोपी सरफराज याच्या हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये काम करत होती. १ एप्रिल रोजी पीडिता क्लिनिकमध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असताना सरफराजने तिच्या नकळत मोबाइलमध्ये फोटो व व्हिडीओ काढले. सरफराजने हे फोटो-व्हिडीओ पीडितेला दाखवून आपल्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तगादा लावला. माञ पीडितेने नकार दिल्यानंतर फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपीला गुरूवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तपासाला वेग येणार आहे.

गुंगीचे औषध देवून पीडितेवर अत्याचार

एप्रिलच्या अखेरीस सरफराजने पाण्यात काहीतरी मिसळून ते पीडितेला दिले. त्यानंतर ऑपरेटसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे असल्याचे सांगितले. सुमारे चार तासांनी पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. सरफराजने अत्याचाराचे व्हिडीओ दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद आहे.

अन् वारंवार अत्याचार

पीडितेने कॉलेजला न जाता आपल्या क्लिनिकमध्येच काम करावे आणि आपण सांगेल त्याप्रमाणे वागावे, असा तगादा पीडितेकडे लावला. त्यानंतर १४ व १५ मे, २० मे आणि ३० मे रोजी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इच्छेविरुद्ध अत्याचार केला. २० मे रोजी फुलंब्री येथील एका हॉटेलमध्ये, तर ३० मे रोजी क्लिनिकमध्येच तिच्यावर अत्याचार केल्याचे देखील फिर्यादीत नमुद केले आहे.

हे सुद्धा वाचा : एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

वडील-भावाकडून पीडितेला बेदम मारहाण

१५ जुलै रोजी सायंकाळी क्लिनिकमध्ये सरफराजसोबत पीडितेचे भांडण झाले. त्यावेळी सरफराजने तिचा मोबाइल घेतला. त्यानंतर त्याचा भाऊ अरबाज आणि वडील मेहबूब गोनगावे यांनी पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली. आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत म्हंटले आहे. अरबाजने तिचा बुरखा फाडल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.

Web Title: An outrageous incident involving the molestation of a young woman has occurred in phulambri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
3

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
4

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.