Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीच्या वादातून संतापाचा स्फोट: पुतण्याकडून काकू व चुलत भावाची हत्या, नंतर स्वतः विष प्राशन करून केली आत्महत्या

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निमसडा गावात एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2025 | 08:08 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निमसडा गावात एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

हॉटेल व्यावसायिक सुरेंद्र बंगेरा यांना धमकावल्याचा आरोप असलेला अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीचं पुढे काय झालं?

घटनेत मृत झालेल्यांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे याने केली आहे. प्राथमिक तपासानुसार, महेंद्र मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यात शेतीच्या मालकी व उत्पन्नाच्या वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्याच्या विषयावरूनही तणाव वाढला होता.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून महेंद्र मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यात शेतीच्या धुऱ्यांचे वाटप, उत्पन्नाचे हक्क, आणि काही जमिनी ठेक्याने लावण्यावरून वाद सुरु होता. शुक्रवारी सकाळी वाद विकोपाला गेला. महेंद्रने अचानक संतप्त होऊन आपल्या हातातली कुऱ्हाड घेऊन आधी नितीनवर वार केला आणि त्यानंतर साधना मोहिजे यांच्यावर हल्ला चढवला. दोघेही जागीच ठार झाले. या कृत्यानंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना समजताच अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता. शेतीच्या मालकीहक्कावरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते.सध्या पोलीस पुढील तपास करत असून, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत.

खळबळजनक! अमरावतीत एएसआयची हत्या; आधी गाडीने धडक, नंतर सपासप वार…..

Web Title: Anger erupts over farming dispute nephew kills aunt and cousin then commits suicide by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 08:08 AM

Topics:  

  • crime
  • Crime in Wardha
  • wardha Murder

संबंधित बातम्या

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!
1

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Beed Crime: बीडमध्ये  30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी
2

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
3

Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली
4

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.