Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जर्नादन याच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०१७ मध्ये खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा तो भोगत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 03:17 PM
धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:

पुणे : पुन्हा येरवडा खुल्या कारागृहातून कैद्याने पलायन केल्याचा प्रकार समोर आहे. पुण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील एका शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पलायन केले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना समोर आली आहे.

याप्रकरणी जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जर्नादन याच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०१७ मध्ये खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा तो भोगत होता. त्याला येरवडा खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, मंगळवारी दुपारी दोन ते चार यावेळेत त्याने सुरक्षा रक्षक तसेच तुरूंग कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला. काही वेळानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.

चौकशीच्या भितीने त्या कैद्याचे पलायन

येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने जन्मठेपेची शिक्षा भोगणारा सातारा जिल्ह्यातील एक कैदी पळून गेल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. संतोष लक्ष्मण भिंगारे (मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे या कैद्याचे नाव आहे. आता लागलीच दुसरा कैदी पळून गेल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वीही आरोपीचे पलायन

खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने तो पळाल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (मुळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी २ नागनाथ महादेव भानवसे (वय ५५, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Web Title: Another prisoner escapes from yerwada jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
1

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
3

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
4

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.