Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी

पुणे शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोरट्यासोबतच वाहनचोर देखील सुसाट सुटले आहेत. अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल २५ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2025 | 11:58 AM
पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी

पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोरट्यासोबतच वाहनचोर देखील सुसाट सुटले आहेत. अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल २५ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, मध्यवर्ती भाग असलेल्या खडक, फरासखाना परिसरासह येरवडा, चंदननगर, आंबेगाव, वाघोली, लोणी काळभोर येथून या वाहनाची चोरी झाली आहे. सार्वजनिक रस्ते असो वा खासगी ठिकाणे अश्या सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस लक्ष देत आहेत. दुसरीकडे मात्र शहरात सराईत चोरांनी उच्छाद घातल्याचे चित्र आहे. घराजवळ, सोसायटीच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर तसेच सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या चोरीला जात आहेत. काही क्षणातच हे चोरटे गाडी लॉक केलेली असताना पळवून नेत आहेत. यामुळे खर्‍या अर्थाने वाहन चोर्‍या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.

गेल्या दोन दिवसांत पुणे पोलिसांत वाहनचोरीचे तब्बल २५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात तीन रिक्षांचा समावेश आहे. खडक परिसरातील चिमण्या गणपती मंडळाजवळून दुचाकी चोरी गेली. याबाबत ६५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तर, पेठेतील जोगेश्वरी मंदिर शेजारील लेनमधून दुचाकी चोरीप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तिसऱ्या घटनेत कसबा पेठेतील माणिकचौक येथून रिक्षा चोरीला गेली. याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या भागासह आंबेगाव भागातील ज्ञानेश्वर बिल्डिंग पार्किंग व हडपसर येथील चिंतामणीनगर भागात रिक्षा चोरीची घटना घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय भारती विद्यापीठ, खराडी, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बाणेर भागात वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत.

चोरीच्या घटनेतील वाहने अद्याप शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, महागडी वाहने चोरी जात असल्याने सर्व सामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

विसर्जनाच्या गर्दीत वाहनचोरांचा धुमाकुळ

गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या २५ गुन्ह्यांपैकी जवळपास निम्मे गुन्हे हे शहराच्या मध्यवर्ती भागातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. शहरात ६ व ७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक झाली. त्यात विशेषतः ६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी वाहनांवर डल्ला मारला. आलेल्या नागरिकांनी वाहने रस्त्याच्या कडेला तसेच गल्यामध्ये पार्क केलेली होती. त्यामुळे चोरट्यांसाठी ही अधिक चांगली संधी मिळाली. त्यातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली.

पथकांकडून निराशा

पुणे शहरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र तुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात यश येत नाही. स्थानिक पोलिस व वाहन चोरी विरोधी पथके नेमकी करतात काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडून पुरती निराशा होत आहे.

Web Title: As many as 25 vehicles have been stolen from pune city in two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
2

Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले

Pimpri Chinchwad Crime: संतापजनक! चित्रपटगृहात पती-पत्नीला मारहाण,’चित्रपटाची स्टोरी सांगू नका’ म्हटल्याने संताप
3

Pimpri Chinchwad Crime: संतापजनक! चित्रपटगृहात पती-पत्नीला मारहाण,’चित्रपटाची स्टोरी सांगू नका’ म्हटल्याने संताप

चोरीचे सोने खरेदी करणं सोनाराच्या अंगलट; तब्बल 9 तोळे सोने केले गेले जप्त
4

चोरीचे सोने खरेदी करणं सोनाराच्या अंगलट; तब्बल 9 तोळे सोने केले गेले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.