Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?

राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारातून (RTI) मोठ्या प्रमाणावर दस्तऐवज मिळवून या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, “हे संपूर्ण प्रकरण बीडमधील आहे. 

  • By अनुराधा धावडे
Updated On: Nov 29, 2025 | 04:12 PM
Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?
Follow Us
Follow Us:
  • सुरेश धस यांच्या विरोधात 1000 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप
  • असीम सरोदेंचा सुरेश धस यांच्यावर आरोप
  • सुरेश धस यांच्या जमीन घोटाळा उघड केल्याने जिवाला धोका असल्याचा असीम सरोदेंचा दावा
Asim Sarode News: बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय चर्चा आणखी तीव्र झाली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 1000 कोटी रुपयांची जमीन हडपल्याचा आरोप करणारे राम खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. अशातच वकील असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. “हे प्रकरण माझ्याकडे होते. काही दिवसांपूर्वीच मी राम खाडे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता माझ्याही जीवाला सुरेश धस यांच्या लोकांकडून धोका आहे,” असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.

जागतिक चर्चेचा मध्यवर्ती चेहरा असलेले रशियन राष्ट्राध्यक्ष ‘Vladimir Putin’ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट; आता कसे

राम खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही आमदार सुरेश धस यांच्यावर थेट आरोप केले होत. खाडे यांनी उघड केलेल्या जमीन प्रकरणामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. त्यातच वकील सरोदे यांनी केलेल्या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना असीम सरोदे (Asim Sarode)  म्हणाले, “हजारो एकर देवस्थानची जमीन भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून खासगी मालमत्तेसारखी दाखवण्यात आली. त्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अनेक देवस्थानांच्या जमिनी बळकावल्या. त्या जमिनींवर प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकले. हा खूप मोठा आर्थिक घोटाळा आहे. हे सर्व प्रकरण राम खाडे यांनी समोर आणले होते,” असा दावा सरोदे यांनी केला. राम खाडे यांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी प्रशासन आणि पोलीस विभागावरही अपेक्षेच्या नजरा लागल्या आहेत.

Pune News: २७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर; सुटताच थेट कमिशनर ऑफिसात! ‘महाराज’चा म्हातारा

राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारातून (RTI) मोठ्या प्रमाणावर दस्तऐवज मिळवून या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, “हे संपूर्ण प्रकरण बीडमधील आहे.  देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी हडप करण्यात आल्या, तेही एका भाजप आमदाराच्या माध्यमातून. हा अत्यंत गंभीर प्रकार होता. आम्ही याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने, पुढील पाऊल म्हणून राम खाडे यांच्या माध्यमातून मुंबईतील ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीसोबत 200 ते 300 हून अधिक कागदपत्रे जोडलेली होती,” असा दावा सरोदे यांनी केला.

दरम्यान, हे प्रकरण उघड केल्यानंतरच राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांवर आता या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी दडपण वाढले आहे. 1000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या देवस्थानांच्या जमिनींचा घोटाळा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचे या पुराव्यांमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.” याच प्रकरणामुळे आता आमदार सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला देखील धोका आहे, असा धक्कादायक दावा त्यांनी केला.

देवस्थानांच्या जमिनींच्या कथित गैरव्यवहाराबाबत सुरेश धस यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. आरोपांचे गांभीर्य वाढत असताना, भाजपाची या संपूर्ण प्रकरणावरील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Asim sarode news asim sarode has alleged that bjp mla suresh dhas is threatening his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • BJP Politics
  • MLA Suresh Dhas

संबंधित बातम्या

Vidhan Parishad Election 2026: बंडखोरांना दणका!  महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
1

Vidhan Parishad Election 2026: बंडखोरांना दणका! महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक
2

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
3

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.