crime (फोटो सौजन्य: social media)
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी दर्गा परिसरातून एक चोरीची धक्कदायक घटना समोर येत आहे. यात एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी चक्क थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केला आहे. एटीएम मशीन आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. या चोरीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
दाबेली स्टॉल धारकाला खंडणीची मागणी, विरोध केल्यानंतर धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, विशाल हरिदास इंदूरकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ते एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ४ ऑगस्टला पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न केला आहे. केबिनमधील कॅमेरे देखील फोडण्यात आले आहे. चोरट्यांना चोरी करणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला. याप्रकारे बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अद्याप आरोपी फरार असून त्यांचा देखील शोध घेत आहे. या चोरीची छत्रपती संभाजीनगर परिसरात चर्चा होत आहे.
MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
नागपूरमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. घरातील बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून गळफास लावून त्याने आयुष्य संपवले. दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.
संकेत दाभाडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या दिवशी बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. संकेत घराबाहेर आलाच नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. खोलीमध्ये कोणतीही हालचाल नव्हती. कोणताही आवाज येत नव्हता.
दरम्यान, संकेत दिसला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांनी या संदर्भातील माहिती वार्डनला दिली. वार्डनने संकेतच्या खोलीचा दरवाजा तोडला. तसेच बाथरूमचाही दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
Pune Crime : कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यत; पोलिसांनी केली मोठी कारवाई