crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक मधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार नाशिक शहरातून समोर आला आहे. पांढऱ्या थारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने त्या मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला. हा प्रकार काल (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजताच्या सुमारास सरडा सर्कलवर घडला आहे. पीडित मुलगी ही एका खासगी शिकवणीसाठी बाहेर गेली होती.
नेमकं काय घडलं?
एका खासगी शिकवणीसाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी जात होती. ज्यामध्ये पांढऱ्या थार कारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास सांगितले. परंतु मुलीने त्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहिली. संशयिताने मुलीचा पाठलाग केला आणि मुलीला परत गाडीत बसण्याकरिता तिच्यावर दबाव आणला. सुदैवाने, यात मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठमागे लपून आपला जीव वाचवला.
दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांमुळे अपहरणाचा प्रकार फसला आहे. याप्रकणी पवनानगर मधून एका संशयितास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कपिल गंजीभाई लीला असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच नाव आहे. त्याच्यावर मुंबई नाका पोलिस ठाण्यात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर….
परभणीत दोन गटांत वाद झाल्याचे समोर आले. दोन गटांमध्ये असलेला वाद आता उफाळून आला असून, दोन्ही गट आमनेसामने आले होते. यानंतर एकमेकांना लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यात आठ जण जखमी झाले असून, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिंतूर शहरात ही घडली. यातील जखमींना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात दोन गटात वाद होता. या आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एकमेकांना लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली गेली. एकमेकांवर असलेल्या रागातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत आठ ते दहाजण जखमी झाले आहेत. यातील दोन जणांना डोक्यात मार असल्याने गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.