crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर: उपराजधानी नागपूरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या चिमुकलीचा अपहरण करून लैंगिक चाळे करण्याचा एका नराधमाचा प्रयत्न फसला आहे. या घटनेचा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या; चिठ्ठीत दोन पोलिसांवर आरोप
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जूनच्या पहाटेच्या वेळेला मानकापूर परिसरात घडली आहे. आरोपीचं नाव श्रावण कुमार यदाब आहे. तो पहाटे ५ वाजताच्या सुमारास परिसरात एका झोपडीत आपल्या आजीसह झोपलेल्या एका ५ वर्षिय चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आजीला जाग आल्यामुळे आरोपी चिमुकलीला उचलून नेण्यास अपयशी ठरला. यात वेळीच आजीने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी घटनास्थळातून पळून गेला.
आणखी एका चिमुकलीचा विनयभंग
दुसऱ्या दिवशी आजीने या संधर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासले आणि आरोपी श्रावण यादव याला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने त्याच दिवशी रात्री अश्याच पद्धतीने पुन्हा एका चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक कबुली दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला गाडीत बसवून बंदुकीच्या धाकाने लैंगिक संबंधांची मागणी
नवी मुंबई: एका महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले आणि बंदुकीच्या धाकावर तिला लैंगिक संबंद ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. आरोपीचं नाव कुंदन नेटके असे आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सात जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. पीडित महिला मेट्रो स्टेशनकडे चालत जात होती. त्याचवेळी आरोपी कुंदन नेटके यांनी तिचा पाठलाग करत गाडी थांबवली. मला एक बोलायचं आहे असं म्हणत त्याने पीडितेला गाडीत बसण्यास भाग पाडलं. त्यानंतर गाडीमध्ये त्याने पीसीतेनें लैंगिक संबंधाची मागणी केली. तिने विरोध करताच आरोपीने बंदूक दाखवत धमकावलं. या घटनेननंतर पीडित महिलेने कशीबशी आपली सिट्का करत थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 4 (लैंगिक छळ ) आणि कलम 3(2) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे .
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.