सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकारण सध्या चांगेलच चर्चेत आले आहे. माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बाबा जगताप हे त्यांच्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रसारित होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
स्री असणं ठरलं गुन्हा! भूंकपात तालिबान फतव्यामुळे महिलांची ३६ तास दुर्दशा
दोन दिवसांपूर्वी माढ्यात कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण त्यावेळी आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मोबाईलवर झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल झाला.या प्रकरणाच्या केंद्रस्थानी होते बाबा जगताप. बाबा जगताप हेच अजित पवार यांना फोन लावणारे व्यक्ती होते. पण आता बाबा जगतापांचा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणामुळे चर्चेत आलेले जगताप आता या नव्या प्रकरणामुळे राजकीय संकटात सापडले आहेत. या घडामोडींमुळे त्यांना मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार आली होती. ही तक्रार मिळताच तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांनी, पोलील दल घेऊन कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. यानंतर अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. अजित पवारांशी अंजना कृष्णा यांना फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला.
घरातल्या या 5 पदार्थांच्या सेवनाने सांध्यात अडकलेलं संपूर्ण युरिक अॅसिड लघवीतून पडेल बाहेर;
अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. यावेळी अजित पवारांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत महिला अधिकाऱ्याला धमकावले. त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं. यावर अंजली कृष्णा यांनी की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची, पडताळणी करण्याची मगाणी केली. ते ऐकून अजित पवार भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय? एवढी हिम्मत वाढली.. तुमच्यावर अॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.