baba siddque (फोटो सौजन्य: social media )
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या वांद्रे परिसरात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी गोळ्या घालून बाबा सिद्दीकी यांची हत्या केली होती. या हत्याप्रकरणाचा तपास सुरु असतांना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पोलीस की, खंडणीखोर! कारवाईच्या धाकाने तीनवेळा उकळले पैसे
दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतांना आता एक नवीन उपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरही सिद्दीकी कुटुंबियांनी त्यांचा मोबाईल क्रमांक सुरूच ठेवला आहे, कारण तो त्यांच्या व्यावसायिक कामकाजाशी संलग्न आहे. मात्र, २४ जून रोजी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्या ई-मेलमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्या ई-मेलमध्ये शेहझीन सिद्दीकी यांचा आधारकार्ड, पॅन कार्ड, GST क्रमांक आणि त्यांच्या कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडदेखील वापरण्यात आले होते.
ही विनंती मोबाइल सेवा कंपनीकडे सादर करण्यात आली होती. मात्र, कंपनीने ती विनंती सिद्दीकी कुटुंबीयांनाच ई-मेलमार्फत कळवली आणि डॉ. अर्शिया सिद्दीकी यांना सीसीमध्ये ठेवले. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत दिल्लीतील बुराडी परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपीविरोधात यापूर्वीही सायबर गुन्हे दाखल असून, मुंबईत बोरीवली आणि मुख्य दंडाधिकारी न्यायालय क्रमांक ३७ मध्ये दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. बोरीवलीतील एका प्रकरणात आरोपीला यापूर्वी जामीन मिळाला होता.
आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) ( फसवणूक करणे), ६२ (कैदेस पात्र असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न), ३३५ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ३३६ (२) व ३३६ (३) (दस्तऐवजांचे बनावटीकरण), आणि ३४०(२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या असल्याचे भासवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.