
crime (फोटो सौजन्य: social media)
Shivraj Singh Chouhan यांना ISI कडून धमकी; गृह मंत्रालयाकडून Z+ सुरक्षेत वाढ
प्रकरण काय?
नीरजा आंबेकर यांचा तीन वर्षांपुवी म्हणजेच २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू सर्पदंशमुळे झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. आता एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने या प्रकरणात नवीन आणि धक्कदायक माहिती दिली आहे. हे ऐकून पोलिसही चक्रावले.
काय दिली माहिती?
आरोपीने म्हंटले २०२२ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर याचा मृत्यू आकस्मिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट नीरजा यांचा पती आणि व्यावसायिक रुपेश आंबेकर याने रचला. त्यावेळी पोलिसांनी या मृत्यूची एडीआर दाखल केली होती, परंतु तपासात कोणताही सुगावा किंवा संशयित आरोपी न मिळाल्यानं हे प्रकरण तिथंच थांबलं होतं.
सर्पदंशच्या मदतीने हत्या
नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर याने तीन साथीदारांच्या मदतीने त्यांची हत्या केली होती. या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता. 2022 मध्ये रुपेश, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चौघांनी मिळून हा कट रचला होता. रुपेशने घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवला होता. त्यानंतर हत्या नीरजा यांच्या पायाची मालीश करण्याच्या बहाण्याने त्यांना हॉलमध्ये पालथं झोपवण्यात आलं होत. याचवेळी सर्पमित्र चेतन याने किचनमध्ये ठेवलेला साप स्टीकच्या मदतीने बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेच्या हातात दिला. नीरजा हॉलमध्ये झोपलेल्या असतांना आणि त्यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असतांना, ऋषिकेश चाळके याने नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ त्या सापाकडून तीन वेळा दंश करवून घेतला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
कसा उघडकीस आला प्रकार?
ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला काही दिवसांपुरवी करण्यात आला होता. याच प्रकरणी ऋषिकेशला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असतांना, चौकशीदरम्यान त्यांनी ऋषिकेशला ‘तू आणखी काय-काय केलं आहेस?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशनं बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या नीरजा आंबेकर यांच्या हत्येचा खुलासा केला.
धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…
Ans: दुसऱ्या हल्ला प्रकरणात अटक आरोपीच्या चौकशीत कबुली मिळाली.
Ans: सर्पदंशाचा वापर करून नियोजनबद्ध हत्या करण्यात आली.
Ans: चौघे आरोपी अटकेत असून डॉक्टरांची चौकशी सुरू आहे.