राजधानी दिल्लीत भीषण अपघात (फोटो- ani)
देशभरात वाढला थंडीचा कडाका
दिल्लीतील नोएडा भागात वाहनांचा विचित्र अपघात
सहा पेक्षा अधिक वाहने एकमेकांना धडकली
नवी दिल्ली: डिसेंबर महिन्यात तापमानात घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानात (Weather) मोठी घट झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. दरम्यान दिल्लीतील एका एक्सप्रेसवर धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. वाहनांची टक्कर झाली आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत.
राजधानीच्या जवळच असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथील बादलपुर भागात सकाळी भीषण अपघात घडला. 6 पेक्षा जास्त वाहनांनी एकमेकांना जोरदार टक्कर दिली. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवर हा अपघात झाला आहे. दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Accident News: कुंभार्ली घाटात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षात बसलेली महिला थेट…
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने धडक झालेली वाहने बाजूला केली. जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी धुके इतके दाट होते की, 25 मीटरपेक्षा जास्त पुढे दिसत नव्हते. सर्व वाहने हेडलाइट सुरू ठेवून हायवेवरून प्रवास करत होती. दरम्यान दृश्यमानता कमी असल्याने समोरील वाहनांच्या चालकाने धुक्यामुळे अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागील वाहने त्या वाहनाला धडकली.
अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात
अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात एक भयानक रस्ता अपघात झाला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, त्यात सर्वांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, यापैकी १९ कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकुरी टी इस्टेटचे रहिवासी होते. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित कामगारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.
Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मजूर रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना हैलोंग-चकलागम रस्त्यावरील मेटेलियांगजवळील एका टेकडीवरून ट्रक खाली कोसळला. अपघाताच्या वेळी २२ कामगार त्यात होते. ट्रक दरीत पडताना रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिले आणि जवळच्या पोलिस ठाण्याला कळवले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.






