भाईदर : बदलापूरमध्ये झालेल्या दोन चिमुकल्यामुलींवर लैंगिक शोषणाचा वाद आता देशामध्ये पेटला आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामधील नागरिक संतप्त झाले आहेत. काल बदलापूरमधील इंटरनेटचे झामार बसवण्यात आले होते, ज्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर मिरा भाईदर शहरात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे बदलापूरात घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून मिरा रोड स्टेशनं जवळ सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – डोंबिवलीत १० हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती, गर्दीमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त
निषेध मोर्चामध्ये महायुती सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. कोलकत्यात घडलेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरची घटना घडल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. बदलापुरातल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगाराला तातडीने शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मीरा रोड येथे उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर म्हात्रे यांच्या नेतृवाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनेक शिवसैनिक सामील झाले होते.
यावेळी नागरिकांनी “बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर शाळेमधील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा जाहीर निषेध, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे” अशा आशयाचे बॅनर घेऊन मिरभाईंदरमध्ये नागरिकांनी निषेध केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांचा सहभाग होता.
हेदेखील वाचा – बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची झाली होती तीन लग्नं, तीनही बायकांनी…
यावेळी प्रभाकर म्हात्रे-जिल्हा प्रमुख,शंकर विरकर उपजिल्हा प्रमुख,किरण फडणीस-विधानसभा क्षेत्र प्रमुख,आकांक्षा शंकर विरकर-विधानसभा अधिकारी-युवती सेना,प्रमोद सामंत-कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष,सुप्रिया घोसाळकर-उपजिल्हासंघटक,श्रेया क्ल्सारीया,लक्ष्मण कंदलगावकर,नलावडे,फारुकी मोसिन,प्रशांत सावंत,आराध्य सामंत,श्रेयश हडकळर-युवासेना व सोबत इतर पदाधिकारी,युवती सेना,महिलाआघाडी,युवसेना उपस्थित होते.