Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Accident: भीषण अपघात! इलेक्ट्रिक स्कुटीला आयशरची जोरदार धडक; दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू तर…

बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव मार्गावर इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पोच्या भीषण धडकेत दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा 9 वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला. दुसरीकडे रायगडावरून परतताना शिवभक्त कपिल केंजळे याचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 08:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बारामतीतील चौधरवाडी फाट्यावर स्कुटी-टेम्पो अपघातात दोन बहिणी ठार.
  • अपघातात 9 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू.
  • रायगडावरून परतताना शिवभक्त कपिल केंजळे याचाही अपघाती मृत्यू.
बारामती: बारामती येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कुटीला आयशर ट्रकची जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. ही धडक एवढी जोरदार होती की यात दोन अल्पवयीन बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला नऊ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्ववैमनस्यातून बाउन्सरची हत्या; आधी डोळ्यात मिरची पूड टाकली अन् नंतर डोक्यात घातला दगड

काय घडलं नेमकं?

साडेचार वाजताच्या सुमारास निरा- मारेगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेले. या धडकेत अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय 17) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय 15) या दोन्ही सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय 9) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जखमी पवनला तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही बहिणींचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस पुढील तपास करत आहे.

बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी (दि ५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक ठिकाणी केळी, ऊस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण दिन दिवशीच अनेक झाडे कोसळल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र यामध्ये नुकसानच अधिक झाले.

 

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीतील अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: अक्षदा बोडरे (17) आणि सेजल बोडरे (15) या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला.

  • Que: अपघातात कोण जखमी झाला?

    Ans: पवन बोडरे (9) हा गंभीर जखमी झाला आहे.

  • Que: शिवभक्त कपिल केंजळे यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून परतताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Baramati accident horrific accident eicher truck rams into electric scooter two minor sisters die on the spot while

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
3

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.