Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

Firing News: २ लाखांची खंडणी नाकारताच बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर गोळीबार! बारामतीतील थरारक घटनेचा अवघ्या ८ तासांत उलगडा; दोन पिस्तुलांसह मुख्य आरोपी जेरबंद!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 03:52 PM
Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

Follow Us
Follow Us:
  • २ लाखांची खंडणी न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातील कारवर गोळीबार
  • बारामती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासांत या गुन्ह्याचा उलगडा
  • दोन अल्पवयीन मुलांसह मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळेला अटक,दोन पिस्तुले जप्त
Firing News: पुणे जिल्ह्यातील बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभो नगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता. मात्र, बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अवघ्या आठ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन दोन पिस्तुले जप्त करण्यात आली असून, मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे यालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

दोन लाखांच्या खंडणीसाठी पार्किंगमधील कारवर गोळीबार

शनिवारी (२१ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय ३५, रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे, बारामती) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे व त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. कोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(३), ३०८(४), ३(५) आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३५ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच पथके रवाना; अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा उलगडा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाच तपास पथके रवाना केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.

हेही वाचा: Fire Case: डोंबिवलीत संतापजनक थरार! ब्रेकअपचा निर्णय घेताच प्रियकराने पेटवले प्रेयसीचे घर; तरुणी आणि आई-वडिलांचा जीव…

मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळेला अटक

या गोळीबाराच्या गुन्ह्यात बंड्या उर्फ अक्षय काळे याचाही थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे खंडणीसाठी गोळीबार करणाऱ्या आरोपींना अवघ्या आठ तासांत जेरबंद करण्यात यश आले असून, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीतील बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार का करण्यात आला?

    Ans: बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती; ती देण्यास नकार दिल्याने त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमधील कारवर गोळीबार करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे?

    Ans: बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासांत तपास पूर्ण करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आणि मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याला अटक केली.

  • Que: आरोपींकडून कोणता मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे?

    Ans: ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून या गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.

Web Title: Baramati builder car firing case arrested pune rural police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • Extortion Case
  • Firing News
  • MIDC
  • Pune Crime live Updates

संबंधित बातम्या

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन; शासनाची प्रशासकीय मान्यता
1

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन; शासनाची प्रशासकीय मान्यता

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती
2

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
3

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.