Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती

Baramati Firing Incident Businessman Extortion Threat: बारामतीतील शिवशंभोनगर परिसरात उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड गोळीबार केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 09:29 PM
Baramati Firing Incident

Baramati Firing Incident

Follow Us
Follow Us:
  • शिवशंभोनगरमध्ये गोळीबाराचा थरार
  • राजन कोळेकर यांच्या वाहनाला लक्ष्य
  • पोलिसांकडून तपास सुरू
बारामती : बारामती शहरातील गुन्हेगारी घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता थेट उद्योजकांच्या वाहनांना लक्ष्य केले जात असल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१) समोर आली आहे. उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. (Baramati News)

Baramati News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर, किती दर देणार? अखेर आकडा समोर

नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे राजन कोळेकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेपूर्वी कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख ‘डीके’ अशी करून देत दोन लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती वृत्तांतून समोर आली आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याने खंडणीची मागणी आणि गोळीबार यांचा परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील परिस्थितीची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला जात आहे.दरम्यान, बारामतीसारख्या महत्त्वाच्या शहरात उद्योजकाच्या घराजवळच गोळीबाराची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, खंडणी मागणारा आणि गोळीबार करणारे एकच आहेत का, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांच्या तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

चार गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत; टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ, ग्रामस्थांचा संताप

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीमध्ये गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे ही घटना घडली.

  • Que: गोळीबार कोणाच्या गाडीवर करण्यात आला?

    Ans: उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

  • Que: गोळीबारात किती राऊंड फायर करण्यात आले?

    Ans: अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Baramati firing incident businessman rajan kolekar extortion threat pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • baramati news
  • Firing News

संबंधित बातम्या

Baramati News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर, किती दर देणार? अखेर आकडा समोर
1

Baramati News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर, किती दर देणार? अखेर आकडा समोर

महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड
2

महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?
3

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
4

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.