Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी धडाकेबाज संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 01:52 PM
बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल...

बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल...

Follow Us
Follow Us:

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी धडाकेबाज संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रकाश ऊर्फ पक्या मोहन काटे (वय २९, रा. कल्याणीनगर, तांदूळवाडी, बारामती), समाधान धर्मराज गायकवाड (सध्या रा. सांगवी, ता. बारामती; मूळ रा. अरणगाव, ता. परंडा, जि. धाराशिव), प्रिन्सकुमार मुन्ना सिंग (वय २२, रा. पुराणी मठीया, बिहार), राहुल कल्याण गोरे (वय २७, रा. उंब्रद, पारगाव, जि. बीड), विकी ऊर्फ पप्पू कांबळे (रा. तांदूळवाडी, बारामती), संग्राम ईर्फ चंदन सिंग (रा. मारुंजी रोड, पुणे) जाॅकी माझी (रा. बुधनी मोना, ओडिशा) अशी आरोपींची नावे आहेत.

‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बारामती शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यातील जळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात दोन प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ४७८ किलो ९५० ग्रॅम गांजा सापडला होता. या गांजाची किंमत तब्बल २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये इतकी होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले.

तपासादरम्यान समाधान धर्मराज गायकवाड आणि विकी ऊर्फ पप्पू कांबळे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगडमधून गांजा आणून बारामती परिसरात साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून काही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आणखी साथीदारांची नावे समोर आली. पोलिसांनी २० मे रोजी दोन इनोव्हा कारचा पाठलाग करत कारवाई केली. सांगली पोलिसांच्या मदतीने एका कारमधून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे ३३ लाख ५५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या कारवर कारवाई करत २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात विक्रीचे जाळे उभे केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

दोन जिल्ह्यांत कारवाई

फेब्रुवारीतील गांजा तस्करीच्या अनुषंगाने पोलिसांकडून कांबळे, संग्रामसिंग व माझी या तिघांचा शोध सुरू होता. दोन मोटारीतून ते गांजा आणण्यासाठी छत्तीसगडकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दि २० मे रोजी ते पंढरपूर-फलटणमार्गे बारामतीकडे येत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, त्यातील एक मोटार तासगावच्या दिशेने गेली. पोलिस व त्यांच्यामध्ये अंतर पडल्याने सांगली एलसीबीच्या मदतीने त्या मोटारीवर कारवाईत कऱण्यात आली. त्यात १३४ किलो ग्रॅम वजनाचा ३३ लाख ५५ हजारांचा गांजा आढळला. विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दुसऱ्या पथकाने बारामती-फलटण रस्त्यावर शहरानजीक गवारफाटा येते दुसरी मोटार ताब्यात घेतली. त्यात २३ किलोचा ११ लाख ५५ हजार रुपयांचा गांजा आढळला. याप्रकरणी हुसेन सुखदेव लष्करे (वय ३५) आदित्य विकास शिंदे (वय २०, दोघे रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे), युवराज ज्ञानेश्वर दुर्गे (मूळ रा. होताळे, ता. मुळशी; सध्या रा. सुतारदरा, कोथरूड पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली. विकी कांबळे हा इतर साथीदारांच्या मदतीने गांजा खरेदी करून आणत तो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील अन्य विक्रेत्यांना विकत असल्याचे समोर आले.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

Web Title: Baramati police have busted a marijuana smuggling racket and arrested the accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.