Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Road Robbery: रात्रीच्या अंधारात लुटमारीचा थरार अन् ‘पोलिस’ बनून वृद्धाची फसवणूक! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस

Road Robbery: विमानतळ रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या टोळीतील एकाला ४० सीसीटीव्ही फुटेजवरून अटक, तर बारामतीत ८५ वर्षीय माजी सैनिकाला 'पोलीस' सांगून घातला गंडा! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 04:59 PM
Road Robbery: रात्रीच्या अंधारात लुटमारीचा थरार अन् 'पोलिस' बनून वृद्धाची फसवणूक! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस

Road Robbery: रात्रीच्या अंधारात लुटमारीचा थरार अन् 'पोलिस' बनून वृद्धाची फसवणूक! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस

Follow Us
Follow Us:
  • ४० सीसीटीव्ही फुटेजवरून येरवडा पोलिसांनी केले आरोपीला अटक
  • ‘पोलीस’ सांगून तपासणीच्या नावाखाली ८५ वर्षीय माजी सैनिकाच्या अंगठ्यांची लूट
  • टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू; नागरिकांत भीती
Road Robbery: पुणे-नगर रस्त्यावरील विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना मारहाण करून लुटल्याच्या घटना समोर येत होत्या. अखेर या टोळीतील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसरीकडे, बारामतीतही एका ८५ वर्षीय माजी सैनिकासोबत तोतया पोलिसांनी हातचलाखी करत लुटमारीचा धक्कादायक प्रकार घडवला आहे.

हेही वाचा: Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…

कसा झाला गुन्ह्याचा उलगडा?

९ नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली होती. यात चोरट्यांनी एका तरुणाला अडवून मारहाण केली होती. मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडील मोबाइल, सोन्याची अंगठी आणि २९ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला होता.

४० सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा

संबंधित तरुणाने पोलिसात धाव घेत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, लूटमार प्रकरणाचा तपास करताना येरवडा पोलिसांनी परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्याआधारे आरोपी रेहान अश्रफ शेख याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. टोळीतील इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

बारामतीत ८५ वर्षीय माजी सैनिकाला लुटले

बारामतीतही एका ८५ वर्षीय माजी सैनिकासोबत अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना घडली. साहेबराव रामभाऊ खेडकर असे त्यांचे नाव आहे. खेडकर हे आपल्या जुन्या अंगठ्या बदलून दोन नवीन अंगठ्या बनवण्यासाठी बारामतीतील चंदूकाका सराफ येथे गेले होते. तेथून नातेवाईकासोबत दुचाकीवरून परतत असताना हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून आपण पोलीस असल्याचे सांगितले. बारामतीत चोऱ्या वाढल्याचे सांगत तपासणीच्या नावाखाली अंगठ्या काढून घेतल्या आणि रुमालात गुंडाळून परत दिल्या. मात्र, काहीच वेळात आपली फसवणूक झाल्याचे आणि अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विमानतळ मार्गावरील लूटमार प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: येरवडा पोलिसांनी ४० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर लोहगाव येथील कलवड वस्तीत राहणाऱ्या रेहान अश्रफ शेख (वय १९) या आरोपीला अटक केली आहे.

  • Que: ९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या लूटमारीत चोरट्यांनी काय लंपास केले होते?

    Ans: विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणाला मारहाण करून चोरट्यांनी मोबाइल, सोन्याची अंगठी आणि २९ हजार रुपये लुटून नेले होते.

  • Que: बारामतीतील माजी सैनिकाची फसवणूक कशी झाली?

    Ans: ८५ वर्षीय माजी सैनिक साहेबराव रामभाऊ खेडकर हे सराफाकडून दुचाकीवरून परतत असताना, दुचाकीवरील दोघांनी पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली त्यांच्या अंगठ्या काढून घेतल्या व हातचलाखी करून फसवणूक केली.

Web Title: Pune airport road robbery yerwada police baramati ex serviceman cheating sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Baramati Crime News
  • pune crime case
  • Yerwada Police

संबंधित बातम्या

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल
1

Viral Video: घरात मुलगी एकटी असताना खिडकीतून हात आला, नंतर दरवाजा….; पुढे जे घडलं ते धक्कादायक! VIDEO व्हायरल

Pune Crime News: आधी गाडीची धडक अन् मग डोक्यात दगड! संपत्तीच्या वादातून दीरच बनला सैतान; शिक्षिका भावजयचा खून
2

Pune Crime News: आधी गाडीची धडक अन् मग डोक्यात दगड! संपत्तीच्या वादातून दीरच बनला सैतान; शिक्षिका भावजयचा खून

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!
3

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
4

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.