Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime : अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचा कट? 1 लाखांची ऑफर आणि 50 जण…, तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज

बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. या तरुणाला मंदिर उडवण्यासाठी 1 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 02, 2025 | 12:24 PM
अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचा कट? 1 लाखांची ऑफर आणि 50 जण..., तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज

अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचा कट? 1 लाखांची ऑफर आणि 50 जण..., तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज

Follow Us
Close
Follow Us:

Beed Crime News In Marathi : अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीड मधील एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. या तरुणाला मंदिर उडविण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, या मेसेजमध्ये असे नमूद केले आहे की, कटात सहभागी होण्यासाठी आणखी ५० लोकांची आवश्यकता आहे. या संपूर्ण घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव; कारचे चाक डोक्यावरून गेले अन्…

तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहात हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. या कामासाठी ५० लोक हवे असून त्यांना प्रत्येकी 1 लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिते मेसेजद्वारे सांगितले आहे.

संशयविरोधी खटला दाखल

मेसेज पाठवणाऱ्याने पाकिस्तानातील कराची येथील लोकेशनही शेअर केले आहे. या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धमकीचे सत्र सुरुच

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर त्याला बिहारमधील भागलपूरमध्ये अटक करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या. यानंतर, एप्रिल २०२५ मध्ये अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना पाठवण्यात आले होता. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती समोर आली होती. तर ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं देखील धमकीच्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. आता बीडच्या तरूणाला थेट पाकिस्तानमधून अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, होस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Web Title: Beed crime beed youth received message from pakistan to blast ayodhya shri ram temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • Beed
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Crime News: वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव
1

Crime News: वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका
2

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

Madhya Pradesh Crime: संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार
3

Madhya Pradesh Crime: संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार

Uttar Pradesh Crime: खेळता खेळता आईच्या पायाला मिठी, क्षणात घडला अपघात; उकळत्या दुधाने 2 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
4

Uttar Pradesh Crime: खेळता खेळता आईच्या पायाला मिठी, क्षणात घडला अपघात; उकळत्या दुधाने 2 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.