Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: नराधम आजोबांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौकशीत आणखी एक धक्कदायक माहिती समोर

बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ६० वर्षीय आजोबांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच दीड वर्षांपूर्वी चुलत भावानेही अत्याचार केल्याचे समोर आले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 12:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १५ वर्षीय मुलीवर आजोबा आणि चुलत भावाकडून अत्याचाराचा आरोप.
  • डॉक्टरांना संशय आल्यानंतर पीडितेने घडलेली घटना सांगितली.
  • पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बीड: बीड येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या आजोबांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर चौकशीत पीडितेच्या चुलत भावाने देखील अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या आजी आजोबा सोबत राहत होती. तिचे आई- वडील बाहेरगावी कमला गेलेले आहेत. सध्या शाळेत सुट्ट्या असल्याने आजी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी तिच्यासोबत बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना संशय आल्याने तिला विश्वासात घेत तिची विचारणा केली असता तिने घडलेली घटना डॉक्टरांना सांगितली. एवढेच नाही तर तिने आणखी एक धक्कादायक खुलासा केला.

धक्कदायक खुलासा

अल्पवयीन पीडितेने दीड वर्षांपूर्वी तिच्या चुलत भावाने अत्याचार केल्याचा खुलासा केला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. नेकनूर पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भावा विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. या संतापजनक घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुटुंबातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्याने आता मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाही हे देखील समोर आले आहे. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Raigad Crime: उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली अन् थेट जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली…

केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले

बीड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल १० तास ताटकळत ठेवण्यात आले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यात जागून काढावी लागली. या संतापजनक प्रकारामुळे बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता विविध चर्चा होत आहे.

रील्सस्टार रोहिणी पाराध्येने संपवलं आयुष्य, ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना घडली.

  • Que: प्रकरण उघडकीस कसे आले?

    Ans: पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विश्वासात घेतल्यावर तिने अत्याचाराची माहिती दिली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आजोबा आणि चुलत भावाविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Beed crime depraved grandfather abuses minor girl another shocking revelation surfaces during investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.