Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!

Beed Marriage Fraud: संसाराचे स्वप्न पाहत ऊसाची उचल काढून अडीच लाख रुपये मोजले; पण लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच नवरीने काढता पाय घेतला! आधार कार्डवरील वय बोगस निघाले अन् मागे लपलेले एक भयानक आंतरराज्य रॅकेट उजेडात आले

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 05:54 PM
Marriage Fraud

Marriage Fraud

Follow Us
Follow Us:
  • लग्न जमवण्याच्या नावाखाली तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळले
  • बनावट आधार कार्ड बनवून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लावून दिले लग्न
  • मराठवाड्यात लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Beed Marriage Fraud: मराठवाड्यात सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या गंभीर सामाजिक समस्येचा फायदा घेत काही भुरट्या आणि व्यावसायिक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. बीडच्या गेवराई तालुक्यातून असाच एक अत्यंत संतापजनक आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. लग्न जमवण्याच्या बहाण्याने एका होतकरू तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, यामागे एक मोठे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई येथील एका तरुणाच्या विवाहासाठी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील मध्यस्थांशी संपर्क साधण्यात आला होता. गत २२ जून रोजी बायोडाटा दिल्यानंतर मध्यस्थांनी मुलीचा फोटो पाठवून जाफ्राबाद येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम घडवून आणला. १ ऑक्टोबर रोजी तरुणाचे कुटुंब मुलगी पाहण्यासाठी तिथे गेले असता, “मुलीला वडील नाहीत, लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च द्यावा लागेल,” अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. गरिबीमुळे या कुटुंबाने एका ऊस तोडणी मुकादमाकडून आगामी हंगामाची (२०२६-२७) उचल (अडव्हान्स) घेऊन ही रक्कम देण्याचे मान्य केले.

हेही वाचा: Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा

ठरल्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी संबंधित मंडळी कारने गेवराईत आली. ठरल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये आणि उर्वरित २ लाख रुपये रोख स्वरूपात मध्यस्थांना देण्यात आले. त्यानंतर गेवराई येथील मुलाच्या घरी ब्राह्मणाकडून विधिपूर्वक लग्न लावून देण्यात आले.

लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत बंडाळी

लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत नवरीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. “दसऱ्याचा सण झाल्यानंतर जाऊ,” असे नवऱ्या मुलाने समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी मुलीने आपले बिंग फोडत हे लग्न केवळ पैसे आणि दागिने लाटण्याच्या कटाचा भाग असल्याचे स्पष्ट केले. मध्यस्थांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक सत्य उघड

१९ ऑक्टोबर रोजी तरुणीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवला. कागदपत्रांवर वय २० वर्षे दाखवण्यासाठी नवीन आधार कार्ड तयार करण्यात आले असले, तरी तिचे खरे वय अवघे १५ वर्षे ८ महिने असल्याचे (ती अल्पवयीन असल्याचे) चौकशीत निष्पन्न झाले. बळजबरीने गेवराईत आणून आपले लग्न लावून दिल्याचे आणि यात आपलीही फसवणूक झाल्याचे तिने जबाबात मान्य केले.

या प्रकरणी गेवराई पोलिसांनी तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करून पुढील सुधारगृहात पाठवले असून पोलीस या रॅकेटचा कसून शोध घेत आहेत. ऊसतोडीची उचल घेऊन संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाच्या स्वप्नांचा या चतुर टोळीने चुराडा केला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या आईने देखील आपली फसवणूक झाल्याचे बालकल्याण समितीसमोर सांगितले आहे.

हेही वाचा:  Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

आंतरराज्यीय मुलींची खरेदी-विक्री आणि महिला आयोगाचे आवाहन

या संपूर्ण घटनेवर बोलताना महिला बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी पालकांना आणि तरुणांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या समस्येचा गैरफायदा घेऊन पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत, अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका,” असे ते म्हणाले. तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, मराठवाड्यात दुष्काळ आणि विवाह जुळत नसल्याची समस्या गंभीर बनली आहे. याचा फायदा घेत कर्नाटक, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतून मुलींची खरेदी-विक्री केली जात असून यात ३ ते १० लाखांपर्यंत दर आकारले जात आहेत. यात स्वतः मुलीचे आई-वडीलही सामील असल्याचे दिसून येत आहे. या रॅकेटचा बिमोड करून लग्नाळू तरुणांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक पोलिसांनी तातडीने थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही फसवणुकीची घटना कुठे घडली आहे?

    Ans: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, मध्यस्थ जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील होते.

  • Que: फसवणूक कशी करण्यात आली?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळण्यात आले आणि नंतर ती अल्पवयीन मुलगी असल्याचे समोर आले.

  • Que: या प्रकरणात प्रशासनाने काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करून सुधारगृहात पाठवले असून रॅकेटचा तपास सुरू आहे.

Web Title: Beed georai fake marriage fraud minor girl case news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Beed Case
  • Beed Crime
  • Froud News
  • marraige

संबंधित बातम्या

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह
1

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

Beed Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल; परळीतील घटनेने हळहळ
2

Beed Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल; परळीतील घटनेने हळहळ

Nashik Crime News : पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा, महिलेची अर्धनग्न अवस्थेत पूजा; भोंदूबाबाने उकळले साडेसात लाख!
3

Nashik Crime News : पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा, महिलेची अर्धनग्न अवस्थेत पूजा; भोंदूबाबाने उकळले साडेसात लाख!

Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल
4

Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.