
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव उत्तम शिवाजी जाधव असे आहे. तर त्यांच्या पत्नीचं नाव मनीषा जाधव असे आहे. मनीषाचे मयूर पाटील-देशमुख नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मयूरने तिला व तिच्या दोन मुलांना भाडेतत्वावर घर घेऊन दिले होते, त्याच ठिकाणी ते राहत होते. १९ जानेवारीला घटनेच्या दिवशी उत्तम हा मनीषा राहत असलेल्या घरी गेला. तेव्हा मयूर आणि मनिषाने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि पळवून लावले. एवढेच नाही तर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
सासू मंगला भारत खाडे, पत्नी मनिषा, प्रियकर मयूर देशमुख पाटील यांच्या त्रासाला कंटाळून उत्तम जाधवने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हाउसिंग कॉलनी केज येथे राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत जीवन संपवलं. याप्रकरणी आरोपींवर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
बीडमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.
घरातून बाहेर पडले मात्र…
सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षात ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सचिन जाधवर राहत्या घरातून बाहेर पडले मात्र शनिवार पर्यंत घरी परत आले नाही. यावरून त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला. तेव्हा बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेह गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला.
Ans: पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूचा सातत्याने मानसिक छळ.
Ans: पत्नी मनीषा, प्रियकर मयूर पाटील-देशमुख आणि सासू मंगला खाडे.
Ans: अॅट्रॉसिटीसह संबंधित कलमांखाली गुन्हा.