काही महिन्यांपासून शेखर प्राचीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते.कुटुंबीयांनी प्राचीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. प्राचीनेही बोलणे बंद केल्याने शेखर संतापला होता. सोमवारी सकाळी घरी कुणी नाही हे बघून शेखर तिच्या घरात शिरला. बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्राचीने नकार दिला. यावरून शेखर संतापला आणि त्याने प्राचीचे डोके जमिनीवर आपटले आणि गळा दाबून खून केला.
डोक्यात दगड घालून अनोळखी तरुणाची हत्या
नागपूर तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामझुला पुलाखाली बुधवारी अज्ञात तरुणाची डोक्यावर व चेहऱ्यावर दगड घालून निघृण हत्या केली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. त्याच्या अंगावरील कपडे व एकूण दिसण्यावरून तो कामगार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी व कोणतेही कागदपत्र किंवा साहित्य आढळले नाही. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिका चालकाच्या निदर्शनास पुलाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आला.
त्याने तत्काळ याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच तहसील पोलिस ठाण्याचे अधिकारी संजय मेंढे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील फळ विक्रेते व चहावाल्यांकडे चौकशी केली. मात्र, मृताला ओळखणारा कोणीही भेटला नाही. त्यामुळे मृताची ओळख पटली नाही. मृताच्या उजव्या हातावर इंग्रजीत ‘RS’ अशी आद्याक्षरे गोंदवलेली असून, कानामागे ‘रमेश’ असे नाव गोंदवलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयितांमध्ये चार तरुण
मृतदेह घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. परिसरातील काही दुकानदारांनी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ते चार तरुण या भागात फिरताना दिसल्याचे सांगितले.
Ans: शेजारी राहणारा शेखर ढोरे (38).
Ans: नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामझुला पुलाखाली.
Ans: अद्याप ओळख पटलेली नाही; पोलिस तपास सुरू आहे.






