Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच गजाआड

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील माजी सरपंच व कृषी पंप व्यापाऱ्याला तामिळनाडूत बनावट नोटा चलनात आणताना अटक झाली. पेट्रोल पंपावर संशय आल्याने पोलिसांनी कारवाई करत 8.37 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तिरुचिरापल्लीतील पेट्रोल पंपावर 200 रुपयांच्या बनावट नोटांमुळे प्रकार उघड
  • कारमधून 41 बंडल, एकूण ₹8.37 लाखांच्या बनावट नोटा जप्त
  • मदुराई, पुदुक्कोट्टई, तंजावरमध्येही नोटा चलनात आणल्याची कबुली
बीड: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर अली आहे. केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा समोर आला आहे. तामिळनाडू राज्यात तिरुचिरापल्ली जिल्ह्यात त्यांनी हा प्रकार केला.थुवाकुडी पोलिसांनी या दोघांना अटक केली असून तब्बल ८ लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आता या प्रकरणाचा पुढील तपास तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका

काय घडलं नेमकं?

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव रमेश बाबुराव भांगे हे केज तालुक्यातील माजी सरपंच आहे, तर दुसरा व्यक्ती हा नारायम राम पटेल आहे, तो मूळचा राजस्थानचा आहे. तो कृषी पंप व्यापारी आहे. हे दोघे त्यांच्या खाजगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी (२८ जानेवरी) या दोघांनी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरताना त्यांनी 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. त्यानंतर तिथून ते निघून गेले. आरोपी निघून गेल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. सतर्कता दाखवत त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस सापळा रचत मंजाथिदल चेकपोस्टवर त्यांची कार अडवली. जेव्हा कारची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळून आले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ज्याची एकूण रक्कम ८ लाख 37 हजार 800 रुपये इतकी आहे.

आरोपींनी काय दिली कबुली

पोलीस तपासादरम्यान आरोपींनी याआधीही बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे. मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर या परिसरात यापूर्वीही अनेक बनावट नोटा चलनात आणण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

CID कडून सखोल तपास सुरू

या बनावट नोटा आरोपींना कोणी पुरवल्या? या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणाचा आश्रय मिळत होता? या सर्व प्रश्नांचा सखोल तपास गुप्त वार्ता विभाग आणि CID कडून करण्यात येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपासात आणखी धक्कदायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: केज तालुक्यातील माजी सरपंच रमेश भांगे व कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल.

  • Que: बनावट नोटा कशा उघडकीस आल्या?

    Ans: पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

  • Que: पुढील तपास कोण करत आहे?

    Ans: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तामिळनाडू CID व गुप्त वार्ता विभाग सखोल तपास करत आहेत.

Web Title: Beed crime major stir in political circles former sarpanch of kaij arrested in fake currency case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका
1

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन
2

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन

Nashik Crime: नाशिकमध्ये थरार! उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची केली निर्घृण हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न
3

Nashik Crime: नाशिकमध्ये थरार! उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची केली निर्घृण हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला
4

बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.