Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: धक्कादायक! अंबाजोगाईत निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील PG डॉक्टर डॉ. मंदार दाभाडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
  • कारण अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू
  • वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, मानसिक तणावाचा मुद्दा चर्चेत
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैधकीय महाविद्यालयातील एका तरुण आणि अत्यंत होतकरू निवासी डॉक्टरने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.

Chhatrapati Sambhajinagar: हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…

काय घडलं नेमकं?

डॉ. मंदार दाभाडे ते ‘स्वाराती’ रुग्णालयात पदव्युत्तर उच्च शिक्षण घेत होते. उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवाकरण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते अंबाजोगाई येथील चनई परिसरातील रोहिदास नगर भागात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.आज सकाळपासूनच त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आणि बराच वेळ झाला तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार हाक मारून आणि फोन करूनही जेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा परिसरातील नागरिकांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संशय बळावला.

या घटनेची माहिती तातडीने अंबाजोगाई शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता डॉ. मंदार दाभाडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला असून या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कारण अद्याप अस्पष्ट

डॉ. मंदार दाभाडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट आहे का, पोलीस त्यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स आणि अलीकडच्या काळातील वागण्याबाबत सहकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. जेणेकरून या मृत्यूमागचे गूढ उकलण्यास मदत होईल. सध्या या घटनेमुळे पूर्ण अंबाजोगाई शहरात एकच चर्चा सुरू असून डॉक्टर दाभाडे यांच्या मूळ गावी आणि त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात.

  • Que: मृत डॉक्टर कोण होते?

    Ans: डॉ. मंदार दाभाडे, PG शिक्षण घेत असलेले निवासी डॉक्टर.

  • Que: आत्महत्येचं कारण काय आहे?

    Ans: कारण अद्याप स्पष्ट नाही; पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.

Web Title: Beed crime shocking resident doctor commits suicide by hanging in ambajogai motive unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.