
डोंबिवलीतील नामांकित स्कूलमधून १५ लाखांच्या ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी; पाच जण पोलिसांच्या जाळ्यात
मोठा गाव परिसरात नामांकित स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियम प्लेट्सवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. या चोरीप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विष्णूनगर पोलीस ठाण्याचे राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला.
आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मानकोली पुलाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित टेम्पो दिसून आला. चोरीच्या रात्री ॲल्युमिनियम प्लेट्स घेऊन जाण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाचा मोठा गाव परिसरात रस्ता चुकला होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या रस्त्याने प्रवास केला. याच मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो कैद झाल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत अमित कुमार, राहुल प्रल्हाद, आदित्य खांजोडे, प्रकाश घोलप आणि सागर घाटल या पाच जणांना अटक करण्यात आली. अमित कुमार हा चोरीचा मुख्य आरोपी असून, त्याचा भंगार विक्रीचा व्यवसाय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चोरीला गेलेल्या सुमारे सात लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम प्लेट्स जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.
Sangamner Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड
Ans: डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव परिसरात निर्माणाधीन असलेल्या स्वामीनारायण स्कूलमधून ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी झाली.
Ans: विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
Ans: टेम्पो चालक रस्ता चुकल्यामुळे त्याचा टेम्पो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या फुटेजसह मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.