crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शुल्लक कारणावरून अंजनवती गावात एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली असून तिच्या डोक्याला तब्बल 14 टाके पडले आहेत. तर दुसऱ्या घटनेत केज शहरात चायनिज सेंटर चालविणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
अंजनवती गावात महिलेला गंभीर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात याच गावात शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अंजनवतीत महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
जखमी महिला प्रियंका गाढवे या असून, तिच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोल जखम झाली आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिस जबाब नोंदविणार आहेत.
केजमध्ये चायनिज सेंटर चालकावर शस्त्र हल्ला
दुसरीकडे, बीडच्या केज शहरात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उशिरा रात्री घडली.
सय्यद इर्शाद नावाचा युवक बसस्टँडसमोर चायनिज सेंटर चालवत असताना, चार ते पाच जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, इर्शादचा जबाब घेतल्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाणार आहे.
बीड जिल्ह्यात वाढते मारहाणीचे प्रकार
गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात हिंसाचार आणि मारहाणीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनांचा तपास सुरू केला आहे.
शेतीच्या वादातून ७२ वर्षीय महिलेला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
बीड येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव छबू देवकर असे आहे. तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून कोयता आणि लोखंडी पाइपने छबू देवकर यांच्यावर हल्ला केला. ही घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. यांनतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ पोलिसांचीही चौकशी होणार