Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…

बीड जिल्ह्यातील मोहा येथे सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्यानंतर चंद्रहार शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने वडिलांना ‘हा माझा शेवटचा फोन’ असे सांगितले होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 09:05 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात अपमान झाल्याने तरुण नैराश्यात गेल्याचा आरोप
  • आत्महत्येपूर्वी वडिलांना केला शेवटचा फोन
  • संबंधित तरुणीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला
बीड: बीड जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने भर रस्त्यात सर्वांसमोर थोबाडीत मारल्याने हाफ माणूस सहन न झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांना फोन केला होता. त्यात त्याने ‘हा माझा शेवटचा फोन आहे’ असे म्हटले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घडलेली घटना ही बीड जिल्ह्यातील मोहा येथील आहे.

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आहे. तेरा मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातीलच एका तरुणीने करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमोर चंद्रहारला थोबाडीत मारले असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चंद्रहार हा मानसिक तणाव आणि नैराश्यात गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

हा माझा शेवटचा फोन…

14 मे रोजी सायंकाळी चंद्रहार यांनी आपल्या वडिलांना फोन केला, हा माझा शेवटचा फोन आहे यापुढे माझा फोन येणार नाही असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याने आपला फोन बंद केला. हे ऐकून कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. चंद्रहार त्यानंतर करेवाडी शिवारातील मुंगळाचा माळ येथे गेला. तिथे त्यांनी लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. चंद्रहारच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो त्याच्या वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

गुन्हा दाखल

याप्रकरणी चंद्रहारच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai Crime: माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव काय होते?

    Ans: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चंद्रहार राजेभाऊ शिंदे होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील मोहा गावात घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime young man commits suicide after being unable to bear the humiliation of being slapped in public this is my last call

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.