काय घडलं नेमकं?
पीडित बालिकेची आई कामावर गेलेली होती, तर तिचे वडील घरात आजारी अवस्थेत होते. पीडित मुलीचा ५ वर्षांचा मोठा भाऊ घराबाहेर खेळत असतांना नराधमाने त्याला खाऊ घेण्यासाठी पैश्यांचे आमिष दाखवून दुकानात पाठवले. त्यांनतर एकट्या असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आपल्या घरात बोलावून घेतले आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.
Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…
थोड्याच वेळात पीडितेच्या भाऊ दुकानातून बाहेर आला, तेव्हा त्याला बहीण दिसली नाही. त्याने तातडीने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी बाहेर येऊन चिमुरडीचा शोध घेतला. शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे त्यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी जोरजोरात आवाज देऊन दार उघडण्यास भाग पाडले. दार उघडताच संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी आरोपीने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे निर्धशानात आले.
परिसरात संतापाचे वातावरण
तातडीने पीडितेच्या नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत
बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन पीडित मुलीवर अल्पवयीन चुलत भावाने अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या बेकायदेशीर पेक्षा गर्भपात केल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांचे रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
Sindhudurg News: अंघोळीचा आनंद ठरला जीवघेणा! करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली.
Ans: पीडित मुलगी साडेतीन वर्षांची होती.
Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






