Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: किरकोळ कारणावरून तरुणाला संपवलं, गावकऱ्यांचा रास्ता रोको

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाकळी येथील विलास घुले यांच्यावर कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेनंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात आंदोलन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 08:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केज तालुक्यात बॅनरच्या वादातून विलास घुले यांची हत्या.
  • हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हल्ला केल्याची माहिती.
  • आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहे. यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. आता केज तालुक्यातून हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. टाकळी येथील विलास घुले या तरुणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. ही हत्या बॅनर फाडल्याच्या कारणावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. यादरम्यान केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावकरी व नातेवाईकांकडून दोनवेळा रास्ता रोकोचा प्रयत्न देखील करण्यात आला. आता या प्रकरणात केज पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पैशांच्या वादातून लिपिकाचे अपहरण, निर्जन स्थळी 8 तास डांबून बेल्ट-काठीने अमानुष मारहाण; जीवे मारण्याची धमकी

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लिपिकाला निर्जन स्थळी नेत आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली. या प्रकरणातील पीडित लिपिकाचे नाव अनिल पत्की असे आहे. तर महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. तर आरोपीचे नाव वैजनाथ यादव असे आहे. त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना १ लाख रुपये परत केले. वैजनाथ यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला. थेट लिपिकाचे घर गाठले आणि गाडीवर बसवत धारावती तांडा परिसरातील निर्जन स्थळी एका झाडाखाली नेले. तिथे यादव यांच्या दोन साथीदारांनी बेल्ट आणि लाकडाच्या साह्याने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर लिपिकाला पोलिसांकडे गेला तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही मारहाण सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान करण्यात आली. या मारहाणीनंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडले आणि त्यांचा मोबाईल देखील घेतले असे फिर्यादीत म्हंटले आहे.

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडमधील हत्या कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी फाटा परिसरात घडली.

  • Que: विलास घुले यांच्या हत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: बॅनर फाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Que: घटनेनंतर गावकऱ्यांनी काय केले?

    Ans: आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी आणि नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात आंदोलन केले.

Web Title: Beed crime young man killed over minor reason villagers blocked his way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.