CRIME (फोटो सौजन्य - SOCIAL MEDIA)
आजकाल अभ्यासाचा ताण वाढत चालला आहे. स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात वाढत चालली आहे. कुटुंबाकडून देखील अभ्यासाचा दबाव वाढत चालला आहे आणि या ताणाला दबावाला कंटाळून अनेक मुलं आत्महत्या करत आहे. आता अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. कुटुंबाकडून होणाऱ्या अभ्यासाच्या दबावाला कंटाळून एका मुलाने आत्महत्या केली आहे. मुलगा मूळचा बीड जिल्ह्यातला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव उत्कर्ष महादेव हिंगणे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो भोपाळमधील एम्स रुग्णालयात (Bhopal AIIMS) वैद्यकीय अभ्यासक्रमाचेशिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याने ऑनलाईन सुरी मागवून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथील बाथरूममध्ये उत्कर्ष हिंगणे याने आत्महत्या केली. तो पुण्यातील एएफएमसीमध्ये (AFMC) एका कार्यक्रमासाठी आला होता. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की तो अभ्यासामुळे तणावाखाली होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्येचा पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी अधिकच तपास सुरु केला आहे.
ऑनलाईन मागवली सूरी आणि
उत्कर्ष हिंगणे याने ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून सुरी मागवली आणि त्यानंतर त्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून उघडकीस आला आहे. कुटुंबाकडून अभ्यासाचा अधिक तणाव होता. तो तणाव सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली.
व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट
उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक कथित सुसाईड नोट पाठवल्याने पोलिसांनी सांगितले. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी मेसेज पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा उघडकीस आला. त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सकाळी 6.15 वाजता घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात नेण्यात आला. वानवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आणि तपास सुरु करण्यात आला.
Karjat News: धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नेरळ मध्ये पोलिसांकडून शक्ती प्रदर्शन