नेरळमध्ये पोलिसांकडून शक्ती प्रदर्शन
कर्जत: नेरळ जवळील दामत गावातील गोवंश हत्येच्या संशयावरून निर्माण झालेला वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यांनतर आज समस्त हिंदू यांनी नेरळ गावात कुंभारआळी येथे नाथपंथीय समाधी स्थळी होम हवन आयोजित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी शो ऑफ फोर्स चे माध्यमातून पोलिसांचे बळ दाखवण्याचा प्रयत्न नेरळ पोलिसांनी केला.नेरळ पोलिसांच्या माध्यमातून यापूर्वी शो ऑफ फोर्स चे आयोजन केले असता त्यांचा मार्ग हा कुंभार आळी मधून कधीच नसायचा आणि आजचे शक्ती प्रर्दर्शनाचा मार्ग हा कुंभार आळी येथे नाथ पंथीय समाधी स्थळ असा होता.
१० मे रोजी काही गोरक्षक तरुण यांना माहिती मिळाली होती कि मुस्लिम बहुल दामत गावात गोहत्या केली जाणार आहे.त्यामुळे नेरळ पोलिसांना माहिती देत काही हिंदू रात्रीच्या तरुण दामत गावात गेले. त्यावेळी पोलिसांच्या समोर झालेला प्रकार याचा वव्हिडीओ समाज माध्यमांवर काल ११ मे रोजी व्हायरल झाला होता.त्यानंतर तणाव निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलिसांचे उप अधीक्षक यांच्याकडून हिंदू आणि मुस्लिम धर्मीय प्रमुख यांची बैठक घेऊन निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नेरळ पोलिसांकडून आज १२ मे रोजी सांगण्यात आले.त्याचवेळी तो व्हिडो व्हायरल करणाऱ्यांना पोलिसांनी फोन करून चौकशी केल्याची जोरदार चर्चा कर्जत तालुक्यात सुरु आहे.
त्याआधी १० मे रोजीची घटना घडल्यानंतर दामत गावात सुरु असलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या,तर दुसरीकडॆ नेरळ गावात तिथीप्रमाणे एक कार्यक्रम समस्त हिंदू यांच्या बॅनर खाली आयोजित करण्यात आला. नाथपंथीय समाधी स्थळी सालाबादप्रमाणे होम हवन आणि दर्शन सोहळा आयावर्षी समस्त हिंदू यांनी आयोजित केल्याने नेरळ मध्ये तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर नेरळ गाव आणि परिसरात हिंदू मुस्लिम तणाव कमी व्हावा आणि पोलीस अशा सर्व घटनांवर लक्ष्य ठेवून आहेत हे दाखवण्यासाठी नेरळ पोलिसांनी आज भर दुपारी शो ऑफ फोर्स द्वारे पोलिसांचे बळ यांची व्याप्ती दाखवण्याचा प्रयत्न केला.
मोठे धार्मिक सण असल्यावर असे शक्ती प्रदर्शन पोलिसांकडून केले गेले आहे. त्यात नेरळ पोलिसांच्या शक्ती प्रदर्शनाचा मार्ग यापूर्वी बापूराव धारप सभागृह येथून कुंभारआळी मधून मुस्लिम मशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता. यापूर्वी कुंभार आळी भागातून पोलिसांच्या शक्ती प्रदर्शन याचा मार्ग असा कधीही नसायचा. त्यामुळे नाथ पंथीय समाधी असलेल्या रस्त्याने आज नेरळ पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले आणि त्यावेळी नेरळ पोलीस तसेच दंगल नियंत्रक पथक एक तुकडी सहाभागी झाली होती.त्यामुळे नेरळ गावात दामत येथील व्हायरल व्हिडिओचा तणाव आहे हे नेरळ पोलिसांच्या अचानक पणे केलेल्या शक्ती प्रदर्शन यावरून स्पष्ट होत आहे.