Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू

बीडमध्ये टाटा कंपनीच्या नावाचा कथित वापर करून पत्र्यांची विक्री होत असल्याच्या माहितीनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह जालना रोडवरील एका पत्रा उद्योग समूहावर धाड टाकली. कारवाईत काही संशयित साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 03:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बीडमधील एका पत्रा उद्योग समूहावर धाड टाकली.
  • तपासादरम्यान काही पत्र्यांवर ‘टाटा’ नाव पंच केलेले आढळल्याची माहिती समोर आली असून संशयित साहित्य जप्त करण्यात आले.
  • या प्रकरणात ट्रेडमार्कचा गैरवापर झाला का, याचा पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
बीड : सध्या राज्यभर पावसाळा सुरू झाला असून ग्रामीण भागात घरांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. या काळात पत्र्यांना मोठी मागणी असते. बाजारात टाटा कंपनीचे पत्रे मजबूत आणि दर्जेदार मानले जातात. अशातच बीडमध्ये टाटा कंपनीच्या नावाचा कथित वापर करून पत्र्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जालना रोड परिसरातील जैन पत्रा उद्योग समूहावर 3 जुलै रोजी धाड टाकली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

पत्र्यांवर ‘टाटा’ नाव पंच केलेले आढळल्याचा दावा

टाटा कंपनीचे अधिकारी चार दिवस बीडमध्ये ठाण मांडून संबंधित  माहितीची पडताळणी करत होते. तपासादरम्यान काही पत्र्यांवर ‘टाटा’ नाव पंच केलेले आढळल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित उद्योग समूहावर कारवाई केली. या वेळी काही संशयित साहित्यही जप्त करण्यात आले असून ते तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता आणि त्यामागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तेथील पत्रे आणि इतर साहित्याचीही सखोल चौकशी सुरू आहे.

Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

गुन्हा दाखल होणार का?

सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी सुरू आहे. संबंधित पत्र्यांवर ‘टाटा’ नावाचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला होता, तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे नियमभंग किंवा ट्रेडमार्कचा गैरवापर झाला आहे का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी टाटा कंपनीने अधिकृत तक्रार दिल्यास पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडमध्ये नेमकी कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: टाटा कंपनीच्या नावाचा कथित वापर करून पत्र्यांची विक्री होत असल्याच्या माहितीनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने एका पत्रा उद्योग समूहावर धाड टाकली.

  • Que: कारवाईदरम्यान काय आढळून आले?

    Ans: काही पत्र्यांवर 'टाटा' नाव पंच केलेले आढळल्याची माहिती समोर आली असून, काही संशयित साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

  • Que: या प्रकरणात पुढे काय होणार?

    Ans: पोलिस आणि संबंधित यंत्रणा जप्त साहित्य व इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

Web Title: Beed news misuse of tata brand tata officials raid a patra corrugated sheet manufacturing group in beed police investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
1

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
3

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.