Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 10:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विलास घुले हत्या प्रकरणात न्यायासाठी नातेवाईकांचे आंदोलन.
  • धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे सखोल तपासाची मागणी केली.
  • पोलिसांकडून 9 आरोपींविरोधात कारवाई, 6 आरोपी अटकेत.
बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनानंतर या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चाकू हल्ल्यात झालेल्या विलास घुले यांच्या हत्येनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन छेडले होते. तब्बल 9 तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच काही नावांबाबत चौकशीची मागणी होत असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले याची हत्या करण्यात आली. विलास घुले हा हॉटेल चालक होता. तो हॉटेलमध्ये भांडण झालं असतांना मध्यस्थी करण्यासाठी गेला. मात्र आरोपींनी त्याच्यावर धारधार शाश्त्राने वार करत हल्ला चढवला. यात विलास घुले हा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

धनंजय मुंडेंनी दिले निवेदन

मंगळवारी विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मृत विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी याबाबत लेखी स्वरूपात धनंजय मुंडे यांनी निवेदन दिले.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली. यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यांनतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिले. तर रात्री उशिरा 11.00 वा.आंदोलन स्थगित करत विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्रालाही अटक?

या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते. त्यानुसार आता पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी दिलीय. आतापर्यंत या प्रकरणात नऊ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही हजारो लोक केज पोलीस ठाण्यात थिया मांडून बसले असून
न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

💡

Frequently Asked Questions

  • Que: विलास घुले हत्या प्रकरण कुठे घडले?

    Ans: हे प्रकरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडले.

  • Que: धनंजय मुंडेंनी कोणाची भेट घेतली?

    Ans: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून 6 आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Beed political activity intensifies regarding the vilas ghule murder case dhananjay munde meets the chief minister and the role of the mps son is also being investigated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.