crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड: बीडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सातवीतल्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिलं, त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलीच्या पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचं तिने सासूला सांगितलं पण सासूनेही अल्पवयीन मुलीलाच जबरदस्ती केल्याची घटना घडलीय. शेवटी मुलीने धारूर पोलिसांकडे धाव घेतली. या संपूर्णघटनेची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आई सोबत राहत होत्या. २०१६ मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते. 2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तता शिकत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूर मधील एका मंदिरात लावून दिले. या लग्नाला मुलीचा विरोध होता मात्र आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू या सगळ्यांनी तिचं लग्न लावले.
काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले तेव्हा पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर बळजबरी केली, असा आरोप फिर्यादित आहे. या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास देऊ लागले.
शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून गेली आजी आजोबांचं घर गाठलं. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाईला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला. हा घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…
बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही हत्या मध्यरात्री घडली. सकाळी घरातीक मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली आहे. शोभा मुंडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुकाराम मुंडे असं आरोपीचे नाव आहे. तुकाराम हा फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती, त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.
Pune Firing : कोथरूडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; घायवळ टोळीच्या 5 जणांना पोलीस कोठडी