Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …

Husband Kills Wife: "मी तुमची मुलगी मारलीये!" हत्येनंतर सासूला फोन करून थेट पोलीस ठाण्यात सरेंडर झाला नराधम पती; कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून ओसाड शेतात पत्नीचा काटा काढल्याच्या या थरारक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 06, 2026 | 08:54 AM
Husband Kills Wife: "मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!" खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर ...

Husband Kills Wife: "मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!" खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर ...

Follow Us
Follow Us:
  • ताताहल्लीत चंद्राने पत्नी पद्माची हत्या केली
  • सासूला सांगून पतीने पोलिसांत सरेंडर केले
  • विवाहबाह्य संबंधांच्या वादातून हे हत्याकांड घडले
Husband Kills Wife: पत्नीची निर्घृण हत्या करून थेट सासूला फोन करून याची माहिती दिल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना कर्नाटकधून समोर आली आहे. ‘मी तुमची मुलगी पद्माची हत्या केली आहे,’ असे जावयाने फोन करून सासूला सांगितले आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला. ३४ वर्षीय पतीने केलेल्या या भयानक कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

हेही वाचा: Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने…

नेमकी घटना कशी घडली?

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ५ नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील ताताहल्ली गावाच्या बाहेरील भागात ही घटना घडली. ३४ वर्षीय चंद्रा याने त्याची ३० वर्षीय पत्नी पद्मा हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पद्माची हत्या केल्यानंतर आरोपी चंद्राने लगेच सासू नरसम्मा यांना फोन केला आणि “तुझ्या मुलीला मारून टाकलंय,” अशी माहिती दिली. सासूचा फोन कट केल्यानंतर चंद्रा पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, उलट तो थेट जवळच्या पोलीस स्टेशनला पोहोचला आणि आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर गौरीबिदानूर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली.

विवाहबाह्य संबंधांवरून होता वाद

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रा आणि पद्मा यांचे अनेक वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना तीन मुलेही आहेत. मात्र, चंद्राचे गोरामुनहल्लीत राहणाऱ्या श्वेता नावाच्या महिलेसोबत संबंध होते, यावरून चंद्रा आणि पद्मा यांच्यात सतत वाद होत असत. कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनीही चंद्राला याबाबत समजावले होते, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. ४ नोव्हेंबर रोजी कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने घरातील सर्वजण बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चंद्राने सासूलाही बाहेर पाठवले आणि पद्माला तिच्या आई-वडिलांनी विकत घेतलेल्या ओसाड शेतात घेऊन गेला. तिथेच त्याने पद्माच्या गळ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करत तिचा जीव घेतला.

हेही वाचा: Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

पोलिसांकडून तपास सुरू

काजूच्या शेतातून सासूला फोन करून माहिती दिल्यानंतर चंद्राने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पद्माचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध पोलीस घेत असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली आहे?

    Ans: कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील ताताहल्ली गावात ही घटना घडली आहे.

  • Que: आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर काय केले?

    Ans: पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी चंद्राने सासूला फोन करून हत्येची माहिती दिली आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला.

  • Que: या हत्येमागील मुख्य कारण काय होते?

    Ans: पतीचे इतर महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधांवरून दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून सतत वाद सुरू होते, ज्यातून हा खून झाला.

Web Title: Chikkaballapur murder case husband chandra kills wife padma surrenders sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • crime news
  • Husband and wife
  • killing news
  • Murder Case
  • Wife Murder

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?

२५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले
2

२५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…
3

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचं मुंडकं अन् थेट मंदिरात…
4

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचं मुंडकं अन् थेट मंदिरात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.